कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:07 IST2021-05-09T04:07:57+5:302021-05-09T04:07:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे उपचार घेताना मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण ...

Coronary artery disease death | कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे उपचार घेताना मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. पारडी परिसरातील आस्था हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी हा प्रकार घडला. डॉ.केशव वसंतराव मुंडे (२६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी परेश अमरलाल मेलवानी (नेताजी नगर) याचे वडील हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार घेत होते. शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या परेशने त्याच्या पाच ते सहा साथीदारांसह हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. डॉ.मुंडे यांच्या केबिनमध्ये शिरून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनाही आरोपींनी शिवीगाळ केली. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी परेश मेलवानी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Coronary artery disease death