हिंगणा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:30+5:302021-01-08T04:22:30+5:30

हिंगणा : लॉकडाऊनदरम्यान अनेकांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून सहकार्य करणाऱ्या हिंगणा परिसरातील कोरोना योद्ध्यांचा ...

Corona warriors felicitated in Hingana taluka | हिंगणा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

हिंगणा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

हिंगणा : लॉकडाऊनदरम्यान अनेकांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून सहकार्य करणाऱ्या हिंगणा परिसरातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त करण्यात आला. पडोळे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकार सोपान बेताल यांना मूकनायक शताब्दी समारोप वर्षात मूकनायक पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे, तर प्रमुख पाहुणे एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ठाकरे, दिवाकर दळवी, व्यावसायीक प्रभाकर देशमुख, नाना सातपुते, आदी उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत विनोद थूल, बबनराव पडोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, अनील चानपूरकर यांना कोरोना योद्धा समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविक डॉ. अंकुश बुरंगे यांनी केले. सूत्रसंचालन सोपान बेताल, नरेंद्र कुकडे, विजयकुमार राऊत यांनी केले. आभार बबनराव पडोळे, विनायक इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजन रामटेके, बाबा कांबळे, एकनाथ मेश्राम, सुरेश डहाट, कृष्णा मेश्राम, शशिकांत कांबळे, वीरू रंगारी, शिशुपाल उके, संजय जिभेंकर, लीलाधर दाभे यांनी सहकार्य केले.

Web Title: Corona warriors felicitated in Hingana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.