राज्यपालांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:15+5:302021-01-17T04:09:15+5:30
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर येथील राजभवन येथे ...

राज्यपालांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
नागपूर येथील राजभवन येथे आयोजित 'कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसअॅबिलिटी' संस्थेमार्फत आयोजित या कार्यक्रमाला खा. डॉ. विकास महात्मे, व 'कॉमनवेल्थ असोसिएशनचे' अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुनील खापर्डे, पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे प्रोफेसर संजय झोडपे, पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड हुमन रिसोर्सेसचे अध्यक्ष डॉ. विरल कामदार, मेडिकल कॉलेज नागपूरचे डॉ. सुशांत मेश्राम, मेयोचे डॉ. प्रशांत जोशी, डॉ. आशीष सातव, कविता सातव, नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, नागपूर शहर वैद्यकीय शाखेचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, नागपूर जिल्हा वैद्यकीय शाखेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती मानमोडे, होमिओपॅथिक असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश ढाकुलकर, लोक समस्या संशोधन व कल्याण समितीचे डॉ. दिलीप गुप्ता, श्री. उराडे, मैत्री परिवार संस्था नागपूरचे समन्वयक चंद्रकांत पेंडके, लोक जागृती मोर्चाचे ॲडव्होकेट रमण सेनाड, सेवांकुर समाजसेवी संस्थेचे डॉ. सुधीर टोमे, मिशन विश्वास अभियानचे पुष्कर भाई, राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेचे सचिव वामन तेलंग, मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन सामाजिक संस्थेचे डॉ. अभिजित राऊत, राजस्थान महिला मंडळाच्या पद्मश्री सारडा, सीमा मेटांगळे, द कॉमन-वेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसअॅबिलिटीचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, खासदार डॉ. विकास महात्मे आदींचा सत्कार झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रीती मानमोडे यांनी केले तर गिरीश चरडे यांनी आभार मानले.