कोरोना व्हायरस : नागपूर विमानतळावर संशयितांच्या हातावर स्टॅपिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 01:13 IST2020-03-17T01:12:05+5:302020-03-17T01:13:21+5:30
नागपूर विमानतळावर संशयितांची स्क्रीनिंग केली जात आहे. संशयित आढळल्यास त्यांच्या हाताच्या मागील बाजूला स्टॅपिंग केले जात आहे. यामुळे संबंधित व्यक्ती ओळखता येतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

कोरोना व्हायरस : नागपूर विमानतळावर संशयितांच्या हातावर स्टॅपिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. यावर आतापर्यंत १४० कॉल आलेत. त्यांचे निराकरण करण्यात आले. नागपूर विमानतळावर संशयितांची स्क्रीनिंग केली जात आहे. संशयित आढळल्यास त्यांच्या हाताच्या मागील बाजूला स्टॅपिंग केले जात आहे. यामुळे संबंधित व्यक्ती ओळखता येतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
केंद्र सरकारने इटली, चीन, ईराण यासह सात देशातून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्य सरकारने आणखी तीन देशांचा समावेश केला आहे. यात सऊ दी अरब, दुबई व यूएसए आदींचा समावेश आहे. या शहरातून येणाऱ्यात संशयित पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.