शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : सलग दुसऱ्या दिवशी शहरातील रुग्णसंख्या ५०० च्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 23:18 IST

Corona virus कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १०८६, मृत्यूची संख्या २६ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, २,८७२ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर पोहचले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात १०८६ रुग्ण, २६ मृत्यूची नोंद : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १०८६, मृत्यूची संख्या २६ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, २,८७२ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर पोहचले आहे.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन मिळून १९,६३७ चाचण्या झाल्या. यात शहरात १३,७२२ तर ग्रामीणमध्ये ५,९१५ झाल्या. चाचण्यांच्या तुलनेत शहरात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.२४ टक्के, ग्रामीणमध्ये १०.६६ टक्के होते. विशेष म्हणजे, पहिली लाट नोव्हेंबरपासून ओसरू लागल्यानंतर पहिल्यांदाच ११ फेब्रुवारी रोजी रुग्णांची संख्या ५०० झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच गेली. फेब्रुवारी महिन्यात ११८१ हा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक होता. मार्च महिन्याची सुरुवातच हजारावर रुग्णाने झाली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या ३,५०० ते ४,००० च्या घरात गेली. या महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद २६ मार्च रोजी झाली. ४,०९५ रुग्ण आढळून आले होते. एप्रिल महिन्यात तर रुग्णसंख्येचे जुने सर्व विक्रम मोडित निघाले. ६,५०० ते ७,५०० दरम्यान रुग्णांची भर पडत होती. यामुळे चिंतेचे गंभीर वातावरण तयार झाले होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.

आठवडाभरात ७,९०७ रुग्ण, २२४ मृत्यूची भर

आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात ७,९०७ रुग्ण व २२४ मृत्यूची भर पडली. या आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद १९ मे रोजी झाली. १३७७ रुग्ण आढळून आले होते तर, सर्वाधिक मृत्यूची नोंद १८ मे रोजी झाली. या दिवशी ४१ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील तीन दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्या हजाराजवळ आली आहे. मागील काही दिवसापासून शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

 १६ ते २२ मे दरम्यान रुग्ण व मृत्यूसंख्या

१६ मे : ११३३ रुग्ण : ३० मृत्यू

१७ मे : ९७१ रुग्ण : ३० मृत्यू

१८ मे : ११८९ रुग्ण : ४१ मृत्यू

१९ मे : १३७७ रुग्ण : ३६ मृत्यू

२० मे : ११५१ रुग्ण : २८ मृत्यू

२१ मे : १००० रुग्ण : ३३ मृत्यू

२२ मे : १०८६ रुग्ण २६ मृत्यू

 कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १९,६३७

शहर : ४४५ रुग्ण व ७ मृत्यू

ग्रामीण : ६३१ रुग्ण व ९ मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७०,०१७

ए. सक्रिय रुग्ण : १५,२४२

ए. बरे झालेले रुग्ण : ४,४६,०३१

ए. मृत्यू : ८,७४४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर