शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १६ टक्क्यांनी रुग्ण तर १० टक्क्यांनी वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 00:24 IST

ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.

ठळक मुद्देऑगस्ट महिन्यातील धक्कादायक स्थिती : १,२२७ नव्या रुग्णांची भर : ३४ रुग्णांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.सोमवारी १,२२७ नव्या रुग्णांची व ३४ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २९,५५५ तर मृतांची संख्या १,०४५ झाली आहे. आज १,२२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९६४ रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या १,५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. ऑगस्ट महिन्यात भयावह पद्धतीने रुग्णसंख्येत वाढ झाली. यामुळे या महिन्यात रुग्णसंख्या वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत जे प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करू शकतील तेच कोरोनाला दूर ठेवू शकतील, असे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे.रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत ६४५ पॉझिटिव्हनागपूर जिल्ह्यात आज १,९३० रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ६४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. १,८९३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात ५८२ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. एम्समध्ये ७८, मेडिकलमध्ये ७४, मेयोमध्ये ५०, माफसूमध्ये ७३, नीरीमध्ये ५१ तर खासगी प्रयोगशाळेतून २५६ पॉझिटिव्ह आले. ९,२६६ रुग्ण उपचाराखाली असून आतापर्यंत १९,२४४ रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०१५, ग्रामीण भागातील २११ तर एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे.३१ दिवसांत ९१९ मृत्यूजुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले तर मागील महिन्याच्या ३१ दिवसात ९१९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात दोन मृत्यूची नोंद होती. परंतु त्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्या वाढतच गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले. जुने व नियंत्रणात नसलेले आजार, वाढलेले वय व उपचारात झालेला उशीर हे बहुसंख्य रुग्णांमध्ये मृत्यूचे कारण ठरले आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ३,८२३बाधित रुग्ण : २९,५५५बरे झालेले : १९,२४४उपचार घेत असलेले रुग्ण : ९,२६६मृत्यू : १,०४५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर