शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

CoronaVirus in Nagpur : नागपुरात बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 00:44 IST

एरवी कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती. २६५९ रुग्ण बरे झाले तर २०६० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४८,५५० झाली आहे. आज ५३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.

ठळक मुद्दे २०६० पॉझिटिव्ह, ५३ मृत्यू : २६५९ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती. २६५९ रुग्ण बरे झाले तर २०६० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४८,५५० झाली आहे. आज ५३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. मृतांची संख्या १५६९ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १६०९, ग्रामीणमधील ४४७ तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यासोबतच आता सप्टेंबर महिन्यातही रुग्ण व मृत्यूसंख्येची भयावह आकडेवारी समोर येत आहे. परंतु समाधानकारक बाब म्हणजे, बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ३१ ऑगस्ट रोजी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५.११ टक्क्यांवर होते, आता ते ७३.६१ टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत ३५,७३८ रुग्ण बरे झाले आहेत. यात होम आयसोलेशनमधील १९७२४ रुग्ण आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८,८८८ तर ग्रामीणमधील ६८५० रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत शासकीयसह, खासगी हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये ११२४३ रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये ५८६९ रुग्ण आहेत. ९०५८ चाचण्यांमधून६९९८ रुग्ण निगेटिव्हआज अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर असे एकूण ९०५८ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ६९९८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, ५१३१ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ७६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ४३७० रुग्ण निगेटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये १७७१ रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात ७४५ रुग्ण पॉझिटिव्ह तर १०२६ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. एम्स प्रयोगशाळेमधून १७, मेडिकलमधून १८२, मेयोमधून १९८, माफसूमधून १२०, नीरीमधून ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.कोविडने घेतला डॉ. संजय पुरी यांचा जीवरामनगर येथील रहिवासी, वरिष्ठ कन्सल्टंट फिजिशियन डॉ. संजय पुरी (६६) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. सात महिन्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित डॉक्टरचा हा पहिलाच मृत्यू आहे. डॉ. पुरी यांची उत्कृष्ट शिक्षक व फिजिशियन म्हणून ओळख होती. गेल्या २५वर्षांपासून रविनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा देत होते. डॉ. पुरी यांनी एमबीबीएस व एमडीचे शिक्षण मेडिकलमधून पूर्ण के ले होते. काही वर्षे त्यांनी मेडिकलमध्ये लेक्चरर्स म्हणून विद्यार्थ्यांना शिकविले. त्यानंतर कामगार विमा रुग्णालयात त्यांनी सेवा दिली. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ते प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. २२ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली २३ ऑगस्टपासून त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. पुरी हे गेल्या ३५ वर्र्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत होते.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ८८७४बाधित रुग्ण : ४८,५५०बरे झालेले : ३५,७३८उपचार घेत असलेले रुग्ण : ११२४३मृत्यू :१५६९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर