शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात मृतांची संख्या ५०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 22:56 IST

कोरोनाबाधित मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पाच महिन्यात ५०० वर कोरोनाबाधितांचा जीव गेला आहे. सोमवारी यात २४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ५१२ वर गेली आहे.

ठळक मुद्दे६२३ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू : ग्रामीणमध्ये ८५ तर शहरात ५३८ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पाच महिन्यात ५०० वर कोरोनाबाधितांचा जीव गेला आहे. सोमवारी यात २४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ५१२ वर गेली आहे. विशेष म्हणजे, मागील १७ दिवसात ३८१ मृत्यू झाले आहेत, तर याच महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंदही झाली आहे. आज ६२३ नवे रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या १४,६१३ वर पोहचली आहे. बाधितांमध्ये ग्रामीणमधील ८५ तर शहरातील ५३८ रुग्ण आहेत.नागपूर जिल्ह्यातील एकूण मृतांमध्ये ग्रामीण भागातील ८२, शहरातील ३६७ तर जिल्हाबाहेरील ६३ मृत्यू आहेत. मेयोमधील मृतांमध्ये संत्रा मार्केटमधील ४५ वर्षीय पुरुष, खापरखेडा येथील २० वर्षीय युवक, शांतिनगर येथील ६८ वर्षीय पुरुष, जबलपूर येथील १७ वर्षीय मुलगी, बजेरिया येथील ६० वर्षीय पुरुष, साईमंदिर परिसर येथील ५६ वर्षीय महिला, हिंगणा रोड येथील ५२ वर्षीय पुरुष, मध्य प्रदेश येथील ६५ वर्षीय पुरुष, मोमीनपुरा येथील ३२ वर्षीय महिला, इतवारी येथील ५० वर्षीय पुरुष, प्रेमनगर येथील ७५ वर्षीय महिला, मानेवाडा दौलतनगर येथील ६८ वर्षीय पुरुष, खलासी लाईन मोहननगर येथील ७७ वर्षीय पुरुष, भारतनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, जरीपटका येथील ७२ वर्षीय महिला, हजारीपहाड येथील ४४ वर्षीय पुरुष, इतवारी येथील ७३ वर्षीय पुरुष, कळमना येथील ६० वर्षीय महिला, वाडी येथील ३४ वर्षीय महिला, गांजाखेत येथील ७४ वर्षीय महिला, दसरा रोड येथील ६० वर्षीय पुरुष, पार्वतीनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, बगडगंज येथील ७० वर्षीय महिला, पारडी येथील ६५ वर्षीय महिला, महाल झेंडा चौक येथील ६२ वर्षीय पुरुष व महाल येथील ४३ वर्षीय पुरुष आदींचा समावेश होता. यात काही मृतांची नोंद रविवारी झाली आहे.अ‍ॅन्टिजन चाचणीत ३१६ पॉझिटिव्हरॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत आज ३१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अर्ध्या तासात अहवाल मिळत असल्याने व दहा झोनमध्ये नि:शुल्क व्यवस्था केल्याने याचा फायदा होताना दिसून येत आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर केलेल्या चाचणीत ७२, मेयोच्या प्रयोगशाळेत ९८, एम्सच्या प्रयोगशाळेत ४४, नीरीच्या प्रयोगशाळेत ४ व खासगी लॅबमध्ये ८९ अशा एकूण ६२३ रुग्णांची नोंद झाली.होम आयसोलेशनमध्ये २७१४ रुग्णकोविड पॉझिटिव्ह असताना लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले २७१४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची सोय नाही असे ५३७ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये मध्यम व गंभीर लक्षणे असलेले ३३७ रुग्ण आहेत, तर मेडिकलमध्ये ३७७, मेयोमध्ये ३१५, एम्समध्ये ४३ तर कामठी रुग्णालयात १५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण ७,१८६ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज ३७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६,९१५ झाली आहे.मृतांचे प्रमाण ३.५० टक्केजिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन मृतांची संख्या होती. त्यानंतर मे महिन्यात १२, जून महिन्यात १६ तर जुलै महिन्यात १०१ मृतांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३८१ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.५० टक्के मृत्यू झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, भारतात मृत्यूचे प्रमाण १.९३ टक्के तर महाराष्ट्रात ३.३८ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.दैनिक संशयित : २३८बाधित रुग्ण : १४,६१३बरे झालेले : ६,९१५उपचार घेत असलेले रुग्ण : ७,१८६मृत्यू : ५१२महिन्यानुसार मृतांची संख्याएप्रिल २मे १२जून १६जुलै १०१ऑगस्ट ३८१