CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा कहर, ३,३७० पॉझिटिव्ह, १६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:49 PM2021-03-17T22:49:41+5:302021-03-17T22:51:04+5:30

Corona virus जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आणखी गंभीर होत असून बुधवारी तर बाधितांच्या संख्येचा नवा रेकॉर्डच झाला. २४ तासांत जिल्ह्यामध्ये तब्बल ३ हजार ३७० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली; तर मृत्यूचा आकडा १६ इतका होता.

Corona virus in Nagpur: 3,370 positive, 16 deaths | CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा कहर, ३,३७० पॉझिटिव्ह, १६ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा कहर, ३,३७० पॉझिटिव्ह, १६ मृत्यू

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये रुग्णसंख्या वाढतेय, दुसरी लाट की त्सुनामी?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आणखी गंभीर होत असून बुधवारी तर बाधितांच्या संख्येचा नवा रेकॉर्डच झाला. २४ तासांत जिल्ह्यामध्ये तब्बल ३ हजार ३७० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली; तर मृत्यूचा आकडा १६ इतका होता. लॉकडाऊन लावल्यानंतरदेखील साथ नियंत्रणात येत नसल्याचे चित्र असून दुसरी लाट आणखी धोकादायक ठरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५०पर्यंत आली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. मागील काही दिवसांपासून तर सातत्याने रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. अगोदर दररोज पाचशे, मग हजार, त्यानंतर दोन हजार व आता तर थेट सव्वातीन हजारांहून अधिक आकडा झाला आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १,७८,७५६, तर मृतांची संख्या ४,५०५ वर पोहोचली आहे.

चाचण्यांचेही रेकॉर्ड, शहरात २,२६८ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी १५ हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून शहरातील २,६६८ , तर ग्रामीणमधील ६९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्याबाहेरील रुग्णांचाही यात समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ८, ग्रामीणमधील पाच, तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात रुग्णांची एकूण संख्या १,४२, ८३९ व मृत्यूची संख्या २,८९४ झाली. ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या ३४९३० झाली असून, ८०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सक्रिय रुग्ण २१ हजारांपार

सक्रिय रुग्णसंख्येनेदेखील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार ११८ इतकी झाली आहे. यातील १७ हजार १७० रुग्ण नागपूर शहरातील आहेत. विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत ६,१४१ रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात १ हजार २१६ रुग्ण बरे झाले.

कोरोनाची आकडेवारी

दैनिक चाचण्या : १५,०००

एकूण बाधित रुग्ण :१,७८,७५६

सक्रिय रुग्ण : २१,११८

बरे झालेले रुग्ण : १,५३,१३३

एकूण मृत्यू : ४,५०५

बेजबाबदार नागरिक, ढिसाळ प्रशासन

कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आले. मात्र शहरातील अनेक भागांत नागरिक विनामास्कचे कामाशिवाय फिरताना दिसून येत आहे. अनेकजण तर सायंकाळी घराजवळ घोळका करून गप्पा मारतात. मात्र पोलिसांकडून अंतर्गत भागात हवे तसे पेट्रोलिंग वाढविण्यात आलेले नाही. शिवाय महापालिकेच्या पथकांकडूनदेखील दंडवसुलीवरच जास्त भर दिसून येत आहे. प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्यानेच सुपर स्प्रेडर्स खुलेआमपणे फिरत आहेत.

Web Title: Corona virus in Nagpur: 3,370 positive, 16 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.