शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १७ रुग्ण, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:10 IST

मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा तर खासगी हॉस्पिटलमधून पॉझिटिव्ह आलेल्या पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या १४०२ : मृत्यूची संख्या २३

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा तर खासगी हॉस्पिटलमधून पॉझिटिव्ह आलेल्या पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाली. मागील पाच दिवसात पाच मृत्यू झाले तर या महिन्यात ११ बळी गेले आहेत. मृतांची संख्या वाढत असताना, गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या मंदावली आहे. आज १७ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या १४०२ वर पोहचली आहे. गोंदिया येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचे मूत्रपिंड निकामी झाल्याने नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते डायलिसीसवर होते. याच हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत त्यांचा नमुना तपासण्यात आला असता, गुरुवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझटिव्ह आला. ते व्हेंटिलेटरवर होते. रात्री १२.३० वाजताच्या त्याच अवस्थेत मेयोमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. डोबीनगर, मोमीनपुरा येथील ४० वर्षीय महिलेचा घरीच मृत्यू झाल्यानंतर मेयोत आणण्यात आले. कोविड संशयित म्हणून मृताचा नमुना तपासण्यात आला असता पॉझिटिव्ह अहवाल आला. या महिलेला गंभीर स्वरुपाचा मधुमेह असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.कडू ले-आऊट, महाल, वाठोड्यात रुग्णकामठी येथील मिल्ट्री हॉस्पिटलमधून गुरुवारी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना आज पुन्हा चार रुग्णांची भर पडली. या रुग्णांचे नमुने मेयोमध्ये तपासण्यात आले. या शिवाय, कडू ले-आऊट नारी, भोयीपुरा, मोमीनपुरा, डीप्टी सिग्नल कळमना, महाल व वाठोडा येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. नाईक तलाव-बांगलादेश येथून दोन तर एक रुग्ण टाकळघाट, हिंगणा या ग्रामीण भागातील आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण सिम्बॉयसिस येथे क्वारंटाईन होते.२५ रुग्णांना डिस्चार्जमेयो, मेडिकल व एम्समधून २५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यात मेयोमधून ११ रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण चंद्रमणीनगर, नाईक तलाव-बांगलादेश, शांतिनगर, हंसापुरी, अकोला, काटोल येथील आहेत. एम्समधून १२ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात ११ रुग्ण अमरनगर व एक श्रमिकनगर हिंगणा येथील आहे. मेडिकलमधून दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. हे दोन्ही रुग्ण महाल येथील आहेत. आतापर्यंत १०४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.नागपुरातील कोरोना स्थितीसंशयित : २३५४अहवाल प्राप्त : २३५७५बाधित रुग्ण : १४०२घरी सोडलेले : १०४५मृत्यू : २३

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर