शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

CoronaVirus in Nagpur : नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा १२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:24 IST

मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्णांची नोंद झाली तर आज नागपूर जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या १,६११ वर पोहचली आहे. रविनगर क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली असून हा परिसर सील करण्यात आला.

ठळक मुद्दे३३ रुग्णांची भर : रुग्णसंख्या १,६११ : रविनगर क्वॉर्टरमध्ये रुग्णाची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्णांची नोंद झाली तर आज नागपूर जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या १,६११ वर पोहचली आहे. रविनगर क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली असून हा परिसर सील करण्यात आला.नागपूरच्या कारागृहात १ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अशी वर्गवारी करून २१-२१ दिवसांचा कालावधी निश्चित करून व्यवस्थापन करण्यात आले आहे. असे असताना कारागृहात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतोच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनस्तरावर चौकशी केली जात असल्याचे समजते. गुरुवारी नीरीच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेल्या १२ रुग्णांमध्ये एक ग्रुप टू जेलर महिला अधिकारी, १० कर्मचारी व एक कर्मचाऱ्याची पत्नी आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले, कारागृहात साधारण १८०० वर कैदी आहेत. यातील ५५ ते ६० संशयित कैद्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कारागृहात प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही ते म्हणाले. कारागृहात आतापर्यंत ६६ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब पॉझिटिव्ह आले आहेत.अमरावती येथील पुन्हा एक डॉक्टर पॉझिटिव्हमागील आठवड्यात अमरावती येथील एक कोरोनाबाधित महिला डॉक्टर मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भरती झाली असताना आज पुन्हा एक ३० वर्षीय डॉक्टर मेडिकलमध्ये भरती झाला आहे. विशेष म्हणजे, येथे कोविड हॉस्पिटल असताना रुग्ण नागपुरात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माफसु प्रयोगशाळेतून आज सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण व्हीएनआयटीमध्ये दाखल होते. मेयोच्या प्रयोगशाळेतून काटोल येथून दोन, हिंगणा तालुक्यातून व तामिळनाडू या राज्यातून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. याच प्रयोगशाळेतून रविनगर येथील पीडब्ल्यूडी क्वॉर्टरमधून एका रुग्णाची नोंद झाली. या क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मेडिकलमधून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण नाईक तलाव येथील आहेत. लता मंगेशकर प्रयोगशाळेतून एक तर खासगी प्रयोगशाळेतून चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी प्रयोशाळेतील रुग्ण वगळता पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे क्वारंटाईन होते.१६ रुग्ण बरे होऊन घरी परतलेमेयोमधून १०, मेडिकलमधून चार व मिलिट्री हॉस्पिटलमधून १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात मेयोतील हंसापुरी, भोईपुरा, नाईक तलाव-बांगलादेश येथील रुग्ण आहेत. मेडिकलमधील अमरावती, जागृती कॉलनी व नाईक तलाव-बांगलादेश येथील रुग्ण आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,२८२ झाली आहे.संशयित : १,८९६अहवाल प्राप्त : २५,५६५बाधित रुग्ण : १,६११घरी सोडलेले : १,२८२मृत्यू : २५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याjailतुरुंगnagpurनागपूर