CoronaVirus in Nagpur : नागपूर शहरात १ तर, ग्रामीणमध्ये २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 09:44 PM2021-06-12T21:44:36+5:302021-06-12T21:45:03+5:30

Corona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात रुग्ण व मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शनिवारी शहरात २७ रुग्ण व १ मृत्यू तर, ग्रामीणमध्ये ४५ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली.

Corona virus in Nagpur: 1 in Nagpur city and 2 in rural areas | CoronaVirus in Nagpur : नागपूर शहरात १ तर, ग्रामीणमध्ये २ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपूर शहरात १ तर, ग्रामीणमध्ये २ मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात मृतांची संख्या ९००१ : ७५ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात रुग्ण व मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शनिवारी शहरात २७ रुग्ण व १ मृत्यू तर, ग्रामीणमध्ये ४५ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच शहरातील दैनंदिन मृत्यूचा संख्येत मोठी घट आली आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा दोन लाटेने मृत्यूचा आकडा ९००१ झाला आहे. आज ७५ रुग्ण व ६ जणांचे बळी गेले.

कोरोनाचा दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. रुग्ण व मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठताना दिसून आले. एप्रिल महिन्यात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट झाला. मात्र आता कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्णसंख्येसोबतच मृत्यूच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. शनिवारी नागपूर जिल्ह्यात ९३८६ चाचण्या झाल्या. यात शहरातील ७२४१ चाचण्यांमधून ०.३७ टक्के तर ग्रामीणमध्ये २१४५ चाचण्यांमधून २.०९ टक्के बाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारच्या तुलनेत ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हीटीचा दर वाढला आहे. आज २४५ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त होणाºया रुग्णांचा दर ९७.६८ टक्क्यांवर गेला आहे.

आठवड्याभरात ७४७ रुग्ण, ५२ मृत्यू

३० मे ते ५ जून या आठवड्यात १६६७ रुग्ण व ७० मृत्यूची नोंद झाली असताना या आठवड्याभरात, ६ ते १२ जून या दरम्यान ७४७ रुग्ण व ५२ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ०.१५ टक्क्यांवर आला आहे.

ऑक्सिजनचे ४४६० बेड रिकामे

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे २०६२ रुग्ण सक्रिय असून याताील ४२९ रुग्ण विविध शासकीयसह खासगी व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. शनिवारी कोविड ऑक्सिजनचे ४४६०, आयसीयूचे २१६९ तर व्हेंटिलेटरचे ५७४ बेड रिकामे होते.

आठवड्यातील रुग्ण व मृत्यू

६ जून : १९६ रुग्ण : १० मृत्यू

७ जून : १३४ रुग्ण : ०८ मृत्यू

८ जून : ८१ रुग्ण : ०६ मृत्यू

९ जून : ८१ रुग्ण : ०५ मृत्यू

१० जून : ९१ रुग्ण : १० मृत्यू

११ जून : ८९ रुग्ण : ०७ मृत्यू

१२ जून : ७५ रुग्ण : ०६ मृत्यू

 कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ९३८६

शहर : २७ रुग्ण व १ मृत्यू

ग्रामीण : ४५ रुग्ण व २ मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७६,३४३

ए. सक्रीय रुग्ण : २०६२

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६५,२८०

ए. मृत्यू : ९००१

Web Title: Corona virus in Nagpur: 1 in Nagpur city and 2 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.