शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : नागपुुरातील २० टक्के लहान मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज, सिरो सर्वेक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 06:52 IST

Corona Virus : लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

- सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात  येत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरण चाचणीला सुुरुवात झाली आहे. यात शहरातील पालकांसाठी एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. लसीकरण चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या १२ ते १८ वयोगटातील ५० पैकी १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अ‍ॅण्टिबॉडीज) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लहान मुलांवरील लसीकरणासाठी राज्यात पहिल्यांदाच नागपुरात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या पुढाकारात १२ ते १८ या वयोगटात कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ५० सुदृढ मुलांची निवड करण्यात आली. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता, १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले. यामुळे डॉक्टरांच्या पथकालाही आश्चर्य वाटले. निवड झालेली मुले सुखवस्तू घरातील आहेत. त्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. शिवाय, मागील दोन महिन्यांत मुलांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, हे विशेष. मुलांमधील अ‍ॅण्टिबॉडीजचा अभ्यास होणे महत्त्वाचेलहान मुलांवरील मानवी चाचणीत ५० मधून १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले आहे. ही एक मोठी संख्या आहे. यामुळे याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. यांना त्यांच्या नातेवाइकांकडून किंवा इतर मुलांकडून लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

    झोपडपट्टीतील लोकांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज  - विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये सिरो सर्वेक्षण करण्यात आले. - यात शहरातील ४९.७ टक्के, तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अ‍ॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले होते. विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये ॲण्टिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहतीत राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या