शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

Corona virus : मेडिकलमध्ये १०० बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:20 PM

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक ती काळजी व रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकींचे सत्र पार पडले. यादरम्यान मेडिकलमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचा अतिदक्षता कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिले १५०० खाटा आरक्षित ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक ती काळजी व रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकींचे सत्र पार पडले. यादरम्यान मेडिकलमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचा अतिदक्षता कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी पालकमंत्री राऊत म्हणाले, कोरोनाला प्रतिबंध हे मानवी जातीशी विषाणूचे असलेले महायुद्ध आहे. त्यात विषाणूला हरवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उपचारासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामध्ये १०० खाटांचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष प्राधान्याने पूर्ण करण्यासोबतच दीड हजार खाटा यासाठी आरक्षित ठेवण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात आज सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी विविध घटकांशी संवाद साधला. त्यात खासगी वैद्यकीय व्यावसायिक, उद्योजक, व्यावसायिक आणि अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त अभिजित बांगर, वनराई संस्थेचे विश्वस्त गिरीश गांधी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे सुरेश राठी, प्रताप मोटवानी, संतोष अग्रवाल, वाधवानी, नंदू गौर, अजय पाटील, कौस्तुभ चॅटर्जी, लना बुधे, रोटरी क्लबचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

खासगी डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहनबैठकीत उपस्थित खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना पालकमंत्री राऊत यांनी मेडिकलमध्ये उपचारासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डॉक्टरांनी सामाजिक भावनेने यात सहकार्य करायला हवे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची तसेच साहित्याचीही आवश्यकता भासल्यास ती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.स्वयंसेवी संस्थांनाही मदतीचे आवाहननागपुरातील महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांनी कोरोना साथीविषयी जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यासाठी काम करावे. उद्योजकांनी सॅनिटायझर, मास्क गाऊनचे उत्पादन करून पुरवठा करावा. निराधार, बेघर, आजारी व्यक्तीस मदतीचा हात द्यावा. अशा कठीण प्रसंगी सर्वांनी मिळून काम करू या, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व घटकांनी यथाशक्ती सहयोग दिल्यास कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो, असा आशावादही पालकमंत्री राऊत यांनी व्यक्त केला.जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईशहरात जीवनावश्यक वस्तूंचा कोणताही तुटवडा नाही. त्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय