कोरोनाचा धोका वाढला, ३७५८ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:00+5:302021-04-07T04:08:00+5:30

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडत असल्याने धोका वाढला आहे. मंगळवारी ३७५८ नवे बाधित रुग्ण आढळून आले, तर ...

Corona risk increased, 3758 new patients | कोरोनाचा धोका वाढला, ३७५८ नवे रुग्ण

कोरोनाचा धोका वाढला, ३७५८ नवे रुग्ण

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडत असल्याने धोका वाढला आहे. मंगळवारी ३७५८ नवे बाधित रुग्ण आढळून आले, तर ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २,४८,८८३ झाली असून, मृतांची संख्या ५,४३८ वर पोहोचली आहे. मंगळवारी रुग्णांचा दर १.५० टक्के, मृत्यूदर २.१८ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचा दर ८१.१३ टक्के होता.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. मंगळवारी १४,५७६ चाचण्या झाल्या. यात ९,४८७ आरटीपीसीआर, तर ५,०८९ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. यातील १०,८१८ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मागील १८ दिवसांपासून ३००० ते ४००० हजार दरम्यान रुग्ण आढळून येत असताना मागील चार दिवसांपासून ३००० वर रुग्ण बरे होत आहेत. मंगळवारी ३३०५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २,०१,९१६ रुग्णांनी कोरानावर मात केली.

-शहरात २,६५२ तर, ग्रामीणमध्ये ११०० रुग्ण पॉझिटिव्ह

नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २,६५२, तर ग्रामीणमधील १,१०० रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील २७, तर ग्रामीणमधील २१ आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याबाहेरील रुग्ण व मृत्यूची संख्या वाढली. आज ६ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली. सध्याच्या स्थितीत ४१,५२९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात ३२,०१७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर ९,५१२ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराखाली आहेत.

कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १४,५७६

ए. बाधित रुग्ण :२,४८,८८३

सक्रिय रुग्ण : ४१,५२९

बरे झालेले रुग्ण :२,०१,९१६

ए. मृत्यू : ५,४३८

Web Title: Corona risk increased, 3758 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.