कोरोना पॉझिटिव्हिटी दर ०.४१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:12+5:302021-07-11T04:08:12+5:30

नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येसोबतच आजाराची भीतीही कमी होताना दिसून येत आहे. शनिवारी नागपूर जिल्ह्यात २५ नव्या रुग्णांची भर ...

Corona positivity rate 0.41 percent | कोरोना पॉझिटिव्हिटी दर ०.४१ टक्के

कोरोना पॉझिटिव्हिटी दर ०.४१ टक्के

नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येसोबतच आजाराची भीतीही कमी होताना दिसून येत आहे. शनिवारी नागपूर जिल्ह्यात २५ नव्या रुग्णांची भर पडली. यात शहरात १३ तर ग्रामीणमध्ये १२ रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या ४,७७,३१५ झाली असून आज एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ९०३२ वर स्थिरावली आहे. पॉझिटिव्हिटीचा दर ०.४१ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांवर पोहचला आहे.

नागपूर जिल्ह्यात या महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत ३४ वर गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या नंतरच्या सात दिवसांत २५च्या आत राहिली. शनिवारी कमी तपासण्या झाल्या. शहरात ४,४४५ तर ग्रामीणमध्ये १,५४१ अशा एकूण ५,९८६ तपासण्या झाल्या. आतापर्यंत शहरात ३,३२,६८२ रुग्ण आढळून आले असून ५,२९९ मृत्यू झाले आहेत. ग्रामीणमध्ये १,४३,०२४ रुग्ण व २,३०६ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २६ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,६८,१२९ झाली आहे. सध्या १५४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १२६ रुग्ण विविध रुग्णालयांत तर २८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-आठवडाभरात १३९ रुग्ण, ३ मृत्यू

२७ जून ते ३ जुलै या सात दिवसांत २१४ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली असताना या आठवडाभरात १३९ रुग्ण व ३ मृत्यू झाले आहेत. यात ४ जुलै रोजी २ तर ९ जुलै रोजी १ रुग्णाचा मृत्यू आहे. उर्वरित पाच दिवसांमध्ये एकही मृत्यू नाही. ५ जुलै रोजी सर्वात कमी, १४ रुग्ण आढळून आले. तर सर्वाधिक, २५ रुग्णांची नोंद १० जुलै रोजी झाली.

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ५,९८६

शहर : १३ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : १२ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७७,३१५

ए. सक्रिय रुग्ण : १५४

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,१२९

ए. मृत्यू : ९,०३२

Web Title: Corona positivity rate 0.41 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.