नऊ दिवसापासून कोरोना मृत्यूसंख्या स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST2021-08-12T04:12:07+5:302021-08-12T04:12:07+5:30
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, मागील नऊ दिवसापासून ...

नऊ दिवसापासून कोरोना मृत्यूसंख्या स्थिर
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, मागील नऊ दिवसापासून कोरोनाचा एकही मृत्यू नाही. मृतांची संख्या १०,११७ वर स्थिरावली आहे. मंगळवारी ५ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९३८ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज ४,५८२ तपासण्या झाल्या. यात शहरात ३,४३३ तपासण्यांमधून १, ग्रामीणमध्ये १,१४९ तपासण्यांमधून २ रुग्ण बाधित आढळून आले. यात २ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरात ३,४०,०१२ रुग्ण व ५,८९२ मृतांची नोंद झाली आहे तर, ग्रामीणमध्ये १,४६,११६ रुग्ण व २,६०३ मृत्यू झाले आहेत. जिल्हाबाहेरील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,८१० तर, मृतांची संख्या १,६२२ वर पोहचली आहे. आज २३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८२,२६७ झाली आहे. सध्या १४४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील ९९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर, ४५ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, आज पॉझिटिव्ह आलेल्या पाचही रुग्णांचे नमुने खासगी पॅथालॉजीमध्ये तपासण्यात आले, तर शासकीय असलेल्या पाचही प्रयोगशाळेत सर्वच नमुने निगेटिव्ह आले.
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ४,५८२
शहर : १ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,९२,९३८
ए. सक्रिय रुग्ण : १४४
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,२६७
ए. मृत्यू : १०,११७