भूमी अभिलेख विभागातील महिला कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST2021-03-29T04:06:12+5:302021-03-29T04:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भूमी अभिलेख उपसंचालक नागपूर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक गायत्री सोनुले यांचे कोरोनाने निधन झाले. गेल्या ...

भूमी अभिलेख विभागातील महिला कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमी अभिलेख उपसंचालक नागपूर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक गायत्री सोनुले यांचे कोरोनाने निधन झाले. गेल्या महिन्यातसुद्धा याच विभागातील अमरावती येथील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक झाकर्डे यांचेसुद्धा कोरोनामुळेच निधन झाले हाेते. परिणामी विभागातील अधिकारी-कर्मचारी हादरले आहेत. यासंदर्भात विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेतर्फे पुणे येथील आयुक्त व संचालक कार्यालयाला पत्र लिहून राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कोट्यातून कोरोनाची लस देण्यात यावी, तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाने मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन तसेच भूमी अभिलेख विभागातील सर्व कामे जनसंपर्काची असल्यामुळे अनेक कर्मचारी अधिकारी हे पॉझिटिव्ह येताहेत. संसर्गाचे दुष्परिणाम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे महसूल व अन्य विभागाच्या धर्तीवर कोविड-१९संसर्ग प्रतिबंधक लस खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे व सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.