शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरात कोरोनाचा शिरकाव : एक आढळला पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 10:50 PM

जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूने नागपुरातही शिरकाव केला आहे. नागपुरातील सात संशयित रुग्णांपैकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागपुरातच नाही तर राज्यभरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे६ संशयित : राज्यभरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूने नागपुरातही शिरकाव केला आहे. नागपुरातील सात संशयित रुग्णांपैकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागपुरातच नाही तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मेयो इस्पितळात दाखल झालेल्या संबंधित रुग्णाचे नमुने बुधवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. रात्री उशीरा या रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असता त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह आढळून आलेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वी ६ मार्चला अमेरिकेहून परत आला होता. त्याला साधारण ताप आहे, मात्र इतर लक्षणे नाही. बुधवारी तपासणीसाठी तो मेयो रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान त्याचा अहवाल प्राप्त झाला व त्यात त्याला कोरोनाचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित रुग्णास मेयोच्या वार्ड क्रमांक २४ मध्ये भरती करण्यात आले आहे. या रुग्णास किंचीत ताप असून इतर लक्षणे नाहीत. मात्र नागपूरला आल्यानंतर ६ मार्चपासून तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याबाबत माहिती घेतली जात आहे. मेयोमध्ये बुधवारी तीन संशयितांना दाखल करण्यात आले होते व त्यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील या संशयिताचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.दरम्यान बुधवारी मेडिकलमध्येही चार संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. या चारही रुग्णांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यातील दोघे कोरोना विषाणू बाधित नसल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित रुग्णांचे अहवाल गुरुवारी मिळणार आहेत. इतर रुग्णांचे नमुनेही गुरुवारीच पाठविण्यात येतील. दरम्यान पुण्यातील कोरोना बाधितासोबत प्रवास करून आलेल्या नागपूरच्या ३ व यवतमाळच्या १० प्रवाशांना कुठलेही लक्षणे आढळून आले नसले तरी सतर्कता म्हणून आरोग्य विभागातर्फे त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात वेगाने होत असून भारतातही संशयित व बाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे.दुबईहून परतलेल्या प्रवाशांची मेडिकलमध्ये तपासणीदुबईहून प्रवास करून आलेले पुण्याचे दोन प्रवासी कोरोना बाधित असल्याचे आढळल्यानंतर संपूर्ण राज्यात सतर्कता वाढविण्यात आली आहे. या बाधितांसोबत दुबई प्रवासाला गेलेल्या सहप्रवाशांचा शोध घेतल्यानंतर आरोग्य विभागाला यवतमाळ जिल्ह्यातील १० तर नागपुरातील तीन प्रवासी आढळून आले. कोरोना विषाणू रुग्णासोबत प्रवास करून आलेल्या नागपुरातील एकाच कुटुंबातील तीन सदस्य आहेत. यात त्यांचा मुलगा पुण्यात थांबला असून, त्याचे आई-वडील नागपुरात आले आहेत. पुण्यात मुलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नागपूरला आलेल्या आईवडिलांशी मेडिकलने संपर्क साधल्यावर त्यांना कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांचे नमुने घेण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. मात्र खबरदारी म्हणून दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी न जाता घरीच थांबण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे यवतमाळ येथील दहाही प्रवाशांची प्रकृती बरी असल्याने आणि कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आलेले नाहीत. परंतु त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जर्मनीचा रुग्ण मेडिकलमध्ये दाखलमेडिकल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जर्मनी रहिवासी नागरिकाला बुधवारी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. हा नागरिक काही कामानिमित्त नागपूरला आला होता. त्याला ताप, खोकला व अंगदुखी आदी कोरोना संशयित लक्षणे आढळून आल्याने रात्री मेडिकलमध्ये भरती ठेवण्यात आले आहे. त्याचे नमुने गुरुवारी मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.आतापर्यंत १४ संशयितगेल्या दिवसांपासून मेडिकलमध्ये दाखल होणाºया कोरोना व्हायरस संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारपर्यंत संशयितांची संख्या १४ वर पोहचली आहे. यापूर्वी ७ कोरोना संशयित रुग्ण मेडिकलच्या कोरोना रुग्णांसाठी सज्ज केलेल्या वार्ड क्र. २५ मध्ये दाखल झाले होते. मात्र त्यांच्यातील एकही रुग्णात कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला नाही, त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोनाindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)