पाटणसावंगीत कोरोना संक्रमण आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:37+5:302021-05-27T04:08:37+5:30

पाटणसावंगी : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सावनेर तालुक्यातील संक्रमणाचा दर सध्या आटोक्यात आला आहे. एप्रिल महिन्यात पाटणसावंगी गावात बाधितांची संख्या ...

Corona infection under control in Patansawangi | पाटणसावंगीत कोरोना संक्रमण आटोक्यात

पाटणसावंगीत कोरोना संक्रमण आटोक्यात

पाटणसावंगी : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सावनेर तालुक्यातील संक्रमणाचा दर सध्या आटोक्यात आला आहे. एप्रिल महिन्यात पाटणसावंगी गावात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने गावबंदी करून गावातील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले आहे. सरपंच रोशनी ठाकरे, उपसरपंच दीपक दलाल यांच्यासह प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप अप्पा, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, ग्रामविकास अधिकारी बबन शृंगारे यांनी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून गावातील संक्रमण साखळी तोडण्यात यश मिळवले आहे. फळ व भाजी विक्रेते वगळता बाजारपेठ असो की गावातील व्यावसायिक प्रतिष्ठाने ठरवून दिलेल्या वेळेवर बंद ठेवल्यामुळे गावात कुठेही गर्दी दिसली नाही. गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून आतापर्यंत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गावात येणाऱ्या पाचही मार्गांवर बांबूचे कठडे लावून बाहेरच्यांना प्रवेश नाकारण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात २१हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंधांशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या गावात लसीकरण मोहिमेवर विशेष भर देण्यात आला आहे.

Web Title: Corona infection under control in Patansawangi