शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

हनुमाननगरात कोरोना संक्रमण झाले बेलगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST

- लक्ष्मीनगर-नेहरूनगरची स्थिती बिकट राजीव सिंह / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे जिल्ह्याची स्थिती अतिशय बिकट झाली ...

- लक्ष्मीनगर-नेहरूनगरची स्थिती बिकट

राजीव सिंह / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे जिल्ह्याची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. झोन स्तरावर विचार केल्यास हनुमाननगर, लक्ष्मीनगर, नेहरूनगर आणि मंगळवारी झोन परिसरात संक्रमण बेलगाम झाले आहे. फेब्रुवारीच्या मधात संक्रमणाने वेग पकडल्यापासून मार्च व एप्रिलमध्ये संक्रमणाने दरदिवशी नवे रेकॉर्ड स्थापित केले आहेत. प्रारंभिक चरणात मनपाकडून संक्रमितांचे आकडे जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून झोन स्तरावर संक्रमितांचे आकडे आकडे जाहीर करण्यात येत आहेत. या तीन दिवसांत प्राप्त अहवालाचे विश्लेषण केल्यास हनुमाननगर झोनची स्थिती भयावह झाली आहे. तीन दिवसात या झोनमध्ये सर्वाधिक २,०७७ संक्रमित आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर १,८६७ रुग्णांसह लक्ष्मीनगर तर तिसऱ्या क्रमांकावर १,७७० रुग्णांसह नेहरूनगर झोन आहे.

आश्चर्यजनक बाब म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत सतरंजीपुरा व गांधीबाग झोनमधून सर्वाधिक संक्रमित सापडले होते. दुसऱ्या लाटेत या दोन्ही झोनमध्ये संक्रमितांची संख्या सर्वात कमी आहे. तीन दिवसात सतरंजीपुरा झोनमध्ये ३३५, गांधीबाग झोनमध्ये ७३० संक्रमित सापडले आहेत. मनपाकडून करवण्यात आलेल्या सर्वेक्षणात पहिल्या लाटेत सतरंजीपुरा व गांधीबाग झोन हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे या दोन्ही झोनमधील ४० टक्के लोकसंख्या संक्रमित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्यात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याने दुसऱ्या लाटेत संक्रमण कमी असल्याचे समजले जात आहे. जेव्हा की पहिल्या लाटेत जेथे संक्रमितांची संख्या कमी होती तेथे दुसऱ्या लाटेत संक्रमण अनियंत्रित झाल्याची स्थिती आहे.

------------------

नेहरूनगर, हनुमाननगर, धंतोलीमध्ये सर्वाधिक मृत्यू

झोन स्तरावर प्राप्त माहितीचे विश्लेषण केल्यास तीन दिवसात नेहरूनगर झोनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या झोनमध्ये १७ संक्रमितांचा जीव गेला. हनुमाननगरमध्ये १५, धंतोलीमध्ये १४, मंगळवारीमध्ये १३, धरमपेठमध्ये १२, लकडगंजमध्ये ११, आसीनगरमध्ये ११, लक्ष्मीनगरमध्ये १०, गांधीबागमध्ये ९ आणि सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वात कमी ८ मृत्यूंची नोंद झाली आहे.

---------------

कोरोना संक्रमणाची स्थिती

झोन - १८ एप्रिल - १७ एप्रिल - १६ एप्रिल - एकूण

लक्ष्मीनगर - ५९१ - ६४८ - ६२८ - १८६७

धरमपेठ - ५२३ - ४७६ - ३७५ - १३७४

हनुमाननगर - ७३१ - ६९९ - ६४७ - २०७७

धंतोली - ४१९ - ५६६ - ३५५ - १३४०

नेहरूनगर - ६०८ - ५९१ - ५७१ - १७७०

गांधीबाग - ३३२ - २१२ - १८६ - ७३०

सतरंजीपुरा - ११६ - ११८ - १०१ - ३३५

लकडगंज - ३८३ - २५८ - २८८ - ९२९

आसीनगर - ४१० - २८८ - २९३ - १३९२

मंगळवारी - ४८९ - ६४७ - ३३५ - १४७१

.........................