जीएसआयमध्ये कोरोनाची लागण, २५ अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:21+5:302021-04-18T04:07:21+5:30
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील केंद्र सरकारच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) कार्यालयात कोरोना पसरला आहे. ...

जीएसआयमध्ये कोरोनाची लागण, २५ अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील केंद्र सरकारच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) कार्यालयात कोरोना पसरला आहे. येथील तब्बल २५ अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.
नागपुरात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक वस्ती व सोसायटीमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयांमध्येसुद्धा कोरोनाने पाय पसरले आहे. नागरिकांचा दररोजचा थेट संबंध येणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये आधीच कोरोनाची लागण पसरलेली होती. परंतु, आता ज्या शासकीय कार्यालयांचा थेट नागरिकांशी संबंध येत नाही, अशा कार्यालयांमध्येसुद्धा आता कोरोना पसरायला लागला आहे. जीएसआय याचे ताजे उदाहरण आहे. येथील २५ पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी धास्तावले आहेत. सध्या ५० टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. एक दिवसाआड कर्मचारी कामावर येत आहेत. परंतु, कंत्राटी मजूर व कर्मचाऱ्यांना दररोजच कामावर यावे लागते. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, कार्यालय काही दिवस बंद ठेवून संपूर्ण इमारत सॅनिटाईज करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. परंतु, वरिष्ठ पातळीवरून अद्याप याची दखल घेतली गेली नसल्याने अधिकारी कर्मचारी घाबरलेले आहेत.
नागपुरात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक वस्ती व सोसायटीमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयांमध्येसुद्धा कोरोनाने पाय पसरले आहे. नागरिकांचा दररोजचा थेट संबंध येणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये आधीच कोरोनाची लागण पसरलेली होती. परंतु, आता ज्या शासकीय कार्यालयांचा थेट नागरिकांशी संबंध येत नाही, अशा कार्यालयांमध्येसुद्धा आता कोरोना पसरायला लागला आहे. जीएसआय याचे ताजे उदाहरण आहे. येथील २५ पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहेत. सध्या ५० टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. एक दिवसाआड कर्मचारी कामावर येत आहे. परंतु, कंत्राटी मजूर व कर्मचाऱ्यांना दररोजच कामावर यावे लागते. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता कार्यालय काही दिवस बंद ठेवून संपूर्ण इमारत सॅनिटाईज करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. परंतु, वरिष्ठ पातळीवरून अद्याप याची दखल घेतली गेली नसल्याने अधिकारी-कर्मचारी घाबरलेले आहेत.