कोरोनाचा फटका ‘१०८’ रुग्णवाहिकेलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:23+5:302021-02-05T04:45:23+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : अपघातात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी रुग्णांना तातडीने सेवा देण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते; परंतु ...

Corona hits 108 ambulance | कोरोनाचा फटका ‘१०८’ रुग्णवाहिकेलाही

कोरोनाचा फटका ‘१०८’ रुग्णवाहिकेलाही

सुमेध वाघमारे

नागपूर : अपघातात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी रुग्णांना तातडीने सेवा देण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते; परंतु कोरोना काळात या सेवेलाही फटका बसल्याचे सामोर आले आहे. २०१९ मध्ये २६४१ जखमींना सेवा देण्यात आली असताना २०२० मध्ये १५३० रुग्णांनीच ‘१०८’ची मदत घेतली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात महिन्याकाठी शंभर रुग्णही समोर आले नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राची जीवनदायी म्हणून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नावरूपास आली. अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही या क्रमांकावर फोन केल्यास तातडीने वैद्यकीय सेवा दिली जाते. अपघातानंतर लगेचच आवश्यक ते प्राथमिक औषधोपचार मिळाल्याने आतापर्यंत हजारो जखमींचे प्राण वाचले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ९३६ रुग्णवाहिका आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ४० रुग्णवाहिका रुग्णसेवा देत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात २०१४ ते २०१९ या काळात दरवर्षी जवळपास ३२६० अपघातातील जखमी रुग्णांना सेवा देण्यात आली; परंतु कोरोनाच्या काळात आंतरजिल्हा वाहतूक बंद होती. रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण कमी होते. परिणामी, अपघातही कमी झाल्याने जखमींची संख्या कमी होऊन रुग्णवाहिकेलाही प्रतिसाद कमी मिळाल्याचे दिसून येत आहे.

-‘लॉकडाऊन’ काळात जखमींची संख्या कमी

मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येताच ‘लॉकडाऊन’ लावण्यात आले. यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात रुग्णवाहिकेची मदत घेणाऱ्या जखमींची संख्या १०० वर गेली नाही. विशेषत: एप्रिल २०१९ मध्ये २९९ जखमींनी १०८ रुग्णवाहिकेची मदत घेतली असताना एप्रिल २०२० मध्ये २५ जखमींनी मदत घेतली.

-‘अनलॉक’ होताच जखमींच्या संख्येत वाढ

‘लॉकडाऊन’च्या काळात अपघाताची संख्या कमी होती; परंतु ‘अनलॉक’ होताच अपघातांची संख्या वाढून जखमींची संख्या वाढल्याचे १०८ रुग्णवाहिकेच्या मदत कार्यातून दिसून येते. नोव्हेंबर २०१९ मध्ये १५१ जखमींनी रुग्णवाहिकेची मदत घेतली असताना नोव्हेंबर २०२० मध्ये १५९ जखमींनी मदत घेतली. तर डिसेंबर २०१९ मध्ये १९८ जखमींनी मदत केली असताना डिसेंबर २०२० मध्ये २१४ जखमींनी मदत घेतली.

-१०८ रुग्णवाहिकेने जखमी रुग्णांना दिलेली सेवा

महिना २०१९ २०२०

जानेवारी २९९ १६०

फेब्रुवारी २७८ १९१

मार्च २९९ १४३

एप्रिल २५२ २५

मे २४३ ४३

जून २२२ ९७

जुलै १९३ ८६

ऑगस्ट १४१ ९५

सप्टेंबर १२१ १०३

ऑक्टोबर १७६ १२०

नोव्हेंबर १५१ १५९

डिसेंबर १९८ २१४

Web Title: Corona hits 108 ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.