विदर्भात वाढतोय कोरोनाचा ग्राफ : ३३८९ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:20 PM2021-03-04T22:20:27+5:302021-03-04T22:24:54+5:30

Corona graph विदर्भात मार्च महिन्यापासून वाढत गेलेला कोरोनाचा ग्राफ सप्टेंबर २०२० मध्ये आपल्या उच्चांकावर होता. ऑक्टोबर महिन्यापासून त्यात घसरण आली. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्राफ वाढताना दिसून येत आहे.

Corona graph on the rise in Vidarbha: 3389 new patients added, 24 deaths | विदर्भात वाढतोय कोरोनाचा ग्राफ : ३३८९ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू

विदर्भात वाढतोय कोरोनाचा ग्राफ : ३३८९ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपुरात १०७० रुग्ण, ८ मृत्यू तर अमरावतीमध्ये ७३६ रुग्ण, ९ मृत्यू

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : विदर्भात मार्च महिन्यापासून वाढत गेलेला कोरोनाचा ग्राफ सप्टेंबर २०२० मध्ये आपल्या उच्चांकावर होता. ऑक्टोबर महिन्यापासून त्यात घसरण आली. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्राफ वाढताना दिसून येत आहे. गुरुवारी पुन्हा रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली. ३,३८९ नवे रुग्ण आढळून आले तर, २४ रुग्णांचे मृत्यू झाले. सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. १,०७० रुग्ण व ८ मृत्यू झाले. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात ७३६ रुग्ण व ९ मृत्यू नोंदविले गेले. अकोल्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. ४७९ रुग्ण पॉझिटिव्ह तर ४ रुग्णांचा जीव गेला. बुलडाणा जिल्ह्यातही रुग्णांची संख्या ४४६ झाली. वाशिम जिल्ह्यात १८३, यवतमाळ जिल्ह्यात १७५ रुग्ण व १ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात १५६ रुग्ण व २ मृत्यूंची नोंद झाली.

जिल्हा -रुग्ण -ए. रुग्ण -मृत्यू

नागपूर १,०७० -१,५३,८८२ -०८

भंडारा ४१ -१३,८२१    -         ००

वर्धा १५६       -     १२,९१२- ०२

गोंदिया २०      -       १४,५००- ००

गडचिरोली १३ -९,६२४ -००

चंद्रपूर ७० -२३,८७३           -  ००

अमरावती ७३६ -३६,४५३ -०९

अकोला ४७९ -१७,९२५ -०४

यवतमाळ १७५ -१८,४०२- ०१

बुलडाणा ४४६ -१९,९८० -००

वाशिम १८३- ९,५४३ -००

Web Title: Corona graph on the rise in Vidarbha: 3389 new patients added, 24 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.