विदर्भात वाढताहेत कोरोनाबाधितांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:30+5:302021-03-04T04:11:30+5:30

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता मृत्यूच्या संख्येतही वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील सहा ...

Corona deaths are on the rise in Vidarbha | विदर्भात वाढताहेत कोरोनाबाधितांचे मृत्यू

विदर्भात वाढताहेत कोरोनाबाधितांचे मृत्यू

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता मृत्यूच्या संख्येतही वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील सहा दिवसात १४८ रुग्णांचे जीव गेले. मंगळवारी ३,४३५ नवे रुग्ण व ३२ मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. ९९५ रुग्ण व १० मृत्यूची भर पडली. तर, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले. १२ मृत्यू व ६३६ नवे रुग्ण आढळून आले. यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व वर्धा जिल्ह्यात आज पुन्हा रुग्ण वाढले. यवतमाळ जिल्ह्यात ५११ रुग्ण व २ मृत्यू, बुलडाणा जिल्ह्यात ४२७ रुग्ण, अकोला जिल्ह्यात ४०७ रुग्ण व २ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात १६६ रुग्ण व १ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात १६० रुग्ण व ३ मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू

नागपूर ९९५ १५१६६० १०

भंडारा ४६ १३७४६ ००

वर्धा १६० १२५८२ ०३

गोंदिया १३ १४४५६ ००

गडचिरोली १० ९५९३ ०२

चंद्रपूर ६४ २३७६० ००

अमरावती ६३६ ३६४५३ १२

अकोला ४०७ १७०१५ ०२

यवतमाळ ५११ १८०८६ ०२ बुलडाणा ४२७ १९२१३ ००

वाशिम १६६ ९२३६ ०१

Web Title: Corona deaths are on the rise in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.