कोरोनावर नवीन उपचार पद्धतीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:46+5:302020-12-02T04:07:46+5:30
नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक लस येऊ पाहत असलीतरी या रोगावर तूर्तास कुठलीही विशिष्ट उपचार पद्धती नाही. परंतु या रोगावर ...

कोरोनावर नवीन उपचार पद्धतीचा दावा
नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक लस येऊ पाहत असलीतरी या रोगावर तूर्तास कुठलीही विशिष्ट उपचार पद्धती नाही. परंतु या रोगावर ‘थायमोसीन अल्फा-१’ उपचार प्रभावी ठरत असल्याचा दावा संसर्गजन्य तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे व फिजिशियन डॉ. निर्मल जयस्वाल यांनी पत्रपरिषदेत केला.
डॉ. शिंदे म्हणाले, या उपचार पद्धतीचा जवळपास २०० प्रकरणांमध्ये वापर केला आहे. या सर्व रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवत लिम्फोपेनिया पुनर्रचना करून ताप, आणि रोगदाहकता कमी करण्यात आला. परिणामी, रुग्णांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा दिसून आली. डॉ. जयस्वाल म्हणाले, ‘थायमोसिन अल्फा-१’मुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये लिम्फोसाइटची संख्या आठवड्याभरात वाढू लागली. यामुळे रुग्णाचा अतिदक्षता विभागातील मुक्काम कमी होऊन मृत्यूदरही कमी झाल्याचे दिसून आले आहे.