शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एक विदेशी, तर तीन घरगुती उड्डाणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 21:04 IST

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे. गो एअरचे मंगळवारी दिल्ली-नागपूर उड्डाण रद्द झाले होते.इंडिगो एअरलाईन्सने दिल्ली-नागपूरची दोन उड्डाणे दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ६ ई ७७४ आणि ६३६ दिल्ली-नागपूर-दिल्ली विमान १८ आणि १९ मार्चला रद्द केले आहे. मंगळवारी सायंकाळी उड्डाण रद्द करण्याचे कारण ऑपरेशनल सांगितले आहे. पण गो एअर विमान कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे कारण विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याशिवाय विमानांच्या कमी संख्येमुळे कंपन्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.कोणताही प्रवासी विमानतळावर होणाऱ्या थर्मल स्कॅनिंग तपासणीतून जाण्यास तयार नाही. त्यामुळे ते प्रवास करण्यास भीती बाळगत आहे. शिवाय प्रवासासाठी नकार देत आहेत. त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या विमानसेवेवर झाला आहे. नागपुरात सर्वच विमानांमध्ये प्रवासी संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. हीच स्थिती जास्त काळ राहिल्यास अन्य उड्डाणेसुद्धा रद्द करण्याची वेळ कंपन्यांना येणार आहे. मध्य रेल्वेने २८ रेल्वे रद्द केल्या आहेत. अशावेळी प्रवास आवश्यक असतानाही अनेक प्रवासी प्रवासाच्या पर्यायांचा भार झेलण्यास विवश होत आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरairplaneविमान