शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मध्यवर्ती कारागृहात होऊ शकतो कोरोनाचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:32 IST

राज्य सरकारने कोरोना नियंत्रणाकरिता वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि महाराष्ट्र प्रीझन मॅन्युअलचे काटेकोर पालन केले जात नसल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : राज्य सरकारला नोटीस बजावली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने कोरोना नियंत्रणाकरिता वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि महाराष्ट्र प्रीझन मॅन्युअलचे काटेकोर पालन केले जात नसल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्यात न्यायालयाने राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, कारागृह पोलीस महासंचालक व नागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.कैदी सुनील काशीनाथ मेश्रामने ही याचिका दाखल केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कारागृहातील कैद्यांना साबण, सॅनिटायझर, मास्क इत्यादी वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. प्लास्टिक ड्रममध्ये पिण्याचे पाणी ठेवले जाते व पाणी पिण्यासाठी केवळ एक जग दिला जातो. तो जग सर्व जण वापरतात. ड्रमला झाकण लावले जात नाही. पाणी पिण्यासाठी पेले दिले जात नाही. घरून कपडे आणू दिले जात नसल्यामुळे कारागृहातील कपडे वारंवार वापरावे लागतात. कैद्यांना प्रतिबंधक गोळ्या दिल्या जात नाही. त्यांची नियमित आरोग्य तपासणी होत नाही. शारीरिक अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. सध्या येथील ३०० वर कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे, असे मेश्रामचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगnagpurनागपूर