कोरोनाचे २९० पॉझिटिव्ह, ३३० बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:08 IST2021-01-22T04:08:58+5:302021-01-22T04:08:58+5:30

नागपूर : मागील पाच दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यातच रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण ...

Corona 290 positive, 330 good | कोरोनाचे २९० पॉझिटिव्ह, ३३० बरे

कोरोनाचे २९० पॉझिटिव्ह, ३३० बरे

नागपूर : मागील पाच दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यातच रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक चित्र आहे. गुरुवारी २९० नव्या रुग्णांची भर पडली, तर ३३० रुग्ण बरे झाले. रुग्णांची एकूण संख्या १,३१,५४० झाली. आज ७ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४,१०६ वर पोहाेचली.

नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २३७, ग्रामीण भागातील ५० तर जिल्हा बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात १,०४,४३४, ग्रामीणमध्ये २६,२५७ तर जिल्हाबाहेरील ८४९ बाधितांची नोंद झाली. मृतांमध्ये शहरात ३, ग्रामीणमध्ये १ तर जिल्हाबाहेर ३ मृत्यू झाले. एकूण मृतांमध्ये शहरातील २,७१०, ग्रामीणमध्ये ७२९ तर जिल्हाबाहेर ६६७ रुग्णांचे मृत्यू झाले. आज ४,०७५ चाचण्या झाल्या. यात ३,४६५ आरटीपीसीआर व ६१० रॅपीड अँटीजेन चाचण्यांचा समावेश होता. अँटीजेनमध्ये ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआर झालेल्या चाचणीत एम्समध्ये २४, मेडिकलमध्ये ५०, मेयोमध्ये ४७, निरीमध्ये १७, नागपूर विद्यापीठामध्ये २७ तर खासगी लॅबमध्ये ८० बाधित रुग्णांची नोंद झाली.

-९३.९९ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

१,२३,६४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचे प्रमाण ९३.९९ टक्क्यांवर गेले आहे. सध्या ३,७९२ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १०१० रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात तर २,७८२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मेडिकलमध्ये १०६, मेयोमध्ये ८० तर एम्समध्ये २९ रुग्ण उपचार घेत आहेत.

-दैनिक संशयित : ४,०७५

-बाधित रुग्ण : १,३१,५४०

_-बरे झालेले : १,२३,६४२

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,७९२

- मृत्यू : ४,१०६

Web Title: Corona 290 positive, 330 good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.