कोरोनाचे २६८ रुग्ण, ५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:34+5:302021-02-07T04:09:34+5:30

नागपूर : कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या मागील सहा दिवसांपासून ३००च्या आत आहे. शनिवारी २६८ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली. ...

Corona 268 patients, 5 deaths | कोरोनाचे २६८ रुग्ण, ५ मृत्यू

कोरोनाचे २६८ रुग्ण, ५ मृत्यू

नागपूर : कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या मागील सहा दिवसांपासून ३००च्या आत आहे. शनिवारी २६८ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १३५७३८ तर मृतांची संख्या ४१९० वर पोहचली. १८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाचे प्रमाण ९४.४९ टक्के झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २१२, ग्रामीणमधील ५४ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत १०७८२०, ग्रामीण भागात २७०२६ तर जिल्हाबाहेर ८९२ रुग्ण आढळून आले. आज नोंद झालेल्या मृतांमध्ये शहरात २, ग्रामीणमध्ये १ तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहेत. आतापर्यंत शहरात एकूण २७३२, ग्रामीणमध्ये ७४८ तर जिल्हाबाहेरील ७१० मृत्यूची नोंद झाली. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२८५२९ वर गेली आहे.

-१० लाख चाचण्या

कोरोनाचा ११ महिन्याच्या काळात नागपूर जिल्ह्यात १०, ८७, ८०८ चाचण्या झाल्या. यात ७,०३, ४३४ आरटीपीसीआर तर ३,८४,३७४ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज ३९५४ चाचण्या झाल्या. सध्या ३२८९ कोरोनाचे रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

-दैनिक संशयित : ३२८९

-बाधित रुग्ण : १३५७३८

_-बरे झालेले : १२८५२९

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३२८९

- मृत्यू : ४१९०

Web Title: Corona 268 patients, 5 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.