शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मका व्यापाऱ्याला अडीच कोटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:42 IST

इतवारीतील एका मका व्यापाऱ्याला वाराणशीच्या एका व्यापाऱ्याने अडीच कोटीचा गंडा घातला. त्याने रक्कम देण्यासाठी तब्बल सहा महिन्यांपासून टाळाटाळ चालविल्याने, अखेर स्थानिक व्यापाऱ्याने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. अवधेश हरिश्चंद्र जयस्वाल (वय ४५) असे आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळच्या अवध गर्वी, सोनपुरा येथील रहिवासी आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील आरोपी : लकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारीतील एका मका व्यापाऱ्याला वाराणशीच्या एका व्यापाऱ्याने अडीच कोटीचा गंडा घातला. त्याने रक्कम देण्यासाठी तब्बल सहा महिन्यांपासून टाळाटाळ चालविल्याने, अखेर स्थानिक व्यापाऱ्याने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. अवधेश हरिश्चंद्र जयस्वाल (वय ४५) असे आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळच्या अवध गर्वी, सोनपुरा येथील रहिवासी आहे.राकेश लक्ष्मीनारायण अग्रवाल (वय ५६) असे तक्रार करणाऱ्या मका व्यापाऱ्याचे नाव आहे. ते स्वामीनारायण एन्क्लेव्ह, श्रीराम चौक वाठोडा येथे राहतात. त्यांचे इतवारीतील अमरदीप टॉकीजजवळ जयभवानी ट्रेडिंग आणि जान्हवी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज नावाने व्यापारी प्रतिष्ठान आहे. येथील धान्यबाजारातून अग्रवाल यांचा मक्याच्या खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय चालतो. सहा महिन्यांपूर्वी आरोपी जयस्वालने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मोठ्या प्रमाणावर मका खरेदी करायचा आहे, असे सांगितले होते. प्रारंभीचे व्यवहार चांगले झाल्याने अग्रवाल यांनी जयस्वालवर विश्वास ठेवला. जयस्वालने मका खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर ३ टक्के कमिशन देण्याचेही प्रलोभन अग्रवाल यांना दिले होते. त्यामुळे अग्रवाल यांनी विविध राज्यातील ठिकठिकाणच्या व्यावसायिकांकडून पाच कोटींचा मका तसेच अन्य चीजवस्तूची खरेदी केली. हा माल त्यांनी आपल्या गोदामात ठेवली; नंतर तो मका जयस्वालने सांगितलेल्या ठिकाणी वाराणसीत पाठविला. अग्रवाल यांनी ज्यांच्याकडून हा मका खरेदी केला त्या सर्व व्यापाऱ्यांना विशिष्ट मुदतीनंतर त्यांची रक्कम परत केली. मात्र, जयस्वालने अग्रवाल यांना पाच कोटींपैकी केवळ अडीच कोटी रुपयेच दिले. अडीच कोटी रुपयांसाठी तो गेल्या सहा महिन्यांपासून अग्रवाल यांना टाळत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपीने जाणीवपूर्वक अग्रवाल यांना नोटीस पाठवून रक्कम अडवून ठेवण्याचीही शक्कल केली. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे अग्रवाल यांनी लकडगंज पोलिसांकडे जयस्वालविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जयस्वालची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीbusinessव्यवसाय