ट्रान्सफाॅर्मरमधील तांब्याच्या तारा लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:49+5:302021-02-06T04:15:49+5:30
टाकळघाट : चाेरट्यांनी विजेचे ट्रान्सफाॅर्मर फाेडून त्यातील १ लाख ८० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चाेरून नेल्या. यात ऑइल सांडल्याने ...

ट्रान्सफाॅर्मरमधील तांब्याच्या तारा लंपास
टाकळघाट : चाेरट्यांनी विजेचे ट्रान्सफाॅर्मर फाेडून त्यातील १ लाख ८० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चाेरून नेल्या. यात ऑइल सांडल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना टाकळघाट (ता. हिंगणा) नजीकच्या बुटीबाेरी एमआयडीसी परिसरात बुधवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.
बुटीबाेरी एमआयडीसी परिसरात अलाॅय नामक कंपनी असून, या कंपनीच्या आवारालगत विजेचे ट्रान्सफाॅर्मर आहे. चाेरट्यांनी ते ट्रान्सफाॅर्मर फाेडले आणि त्यातील तांब्याच्या तारा चाेरून नेल्या. यात ट्रान्सफाॅर्मरमधील ऑइल जमिनीवर सांडले. त्या तारांची किंमत १ लाख ८० हजार रुपये असून, ऑइलची किंमत १० हजार रुपये असल्याचे फिर्यादी बबलूराम टांडे (४०, रा. पचमेठी, जिल्हा रायगड) यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार इकबाल करीत आहेत.