शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

संचारबंदीदरम्यान सहकार्य करा- पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:45 AM

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, कोरोनाशी असलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात आजपासून संचारबंदी व जिल्हाबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातही सद्यस्थितीचा आढावा डॉ. नितीन राऊत यांनी घेतला. या कालावधीत सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत दिली जाणार आहे. मात्र ही वाहने प्रशासनाकडून प्राधिकृत करून घेणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या कालावधीत नियमित सुरू राहणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्नधान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील. पशुखाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषी मालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील. तेव्हा नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, कोरोनाशी असलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.विनाकारण घराबाहेर पडू नका - गृहमंत्रीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत संचारबंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ नागरिकांच्या हितासाठीच घेण्यात आला असून नागरिकांनी या संचारबंदीदरम्यान विनाकारण घराबाहेर पडू नये. कुठल्याही परिस्थिती गर्दी होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतguardian ministerपालक मंत्री