शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कुलरचा ३०० कोटींचा व्यवसाय ठप्प; ५० हजार कर्मचारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:32 IST

कोरोना लॉकडाऊनने कुलरचे उत्पादन आणि विक्री ठप्प झाल्याने नागपुरात जवळपास ३५० पेक्षा जास्त उत्पादकांचे कारखाने बंद असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आर्थिक संकटात आहेत.

ठळक मुद्दे३५० उत्पादकांकडे माल विक्रीविना पडून 

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनने कुलरचे उत्पादन आणि विक्री ठप्प झाल्याने नागपुरात जवळपास ३५० पेक्षा जास्त उत्पादकांचे कारखाने बंद असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. वर्षभर चालणाऱ्या या उद्योगाला जवळपास ३०० कोटींचा फटका बसल्याची माहिती उत्पादक असोसिएशनने लोकमतशी बोलताना दिली.विदर्भ कुलर उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष विजय खेर म्हणाले, कोरोना लॉकडाऊनमुळे कुलर निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. कुलर निर्मितीत नागपूर देशाची मुख्य बाजारपेठ आहे. नागपुरातून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, ओडिशा या राज्यांमध्ये कुलर पाठविले जातात. तसे पाहता वर्षभरच कुलरच्या पार्टची निर्मिती होत असते. पण मुख्य निर्मिती आॅक्टोबरपासून सुरू होते. तेव्हापासून कच्च्या मालाची खरेदी-विक्री करण्यात येते. नागपुरात संघटित आणि असंघटित उत्पादकांकडून वर्षाला दोन लाख कुलरची निर्मिती होते. पण आता सर्वच कारखाने बंद आहेत. ज्यांच्याकडे माल होता, त्यांनी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत कुलरची विक्री केली. पण राज्य शासनाने १९ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर कुलर निर्मिती आणि मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे तयार झालेले कुलर कारखान्यात तर डिसेंबरपासून डीलर्सकडे पाठविलेले कुलर विक्रीविना पडून आहेत. यामुळे संपूर्ण उलाढाल थांबली आहे. ३ मे रोजी लॉकडाऊन हटल्यानंतरही कुलर विक्रीला जास्त वेळ मिळणार नाही. सिझननंतर माल राहिला तर स्टॉक कुठे ठेवणार, हा मोठा प्रश्न आहे.

दोन वर्ष व्यवसाय उठणार नाहीकुलर निर्मिती आणि विक्रीची साखळीच थांबल्याने बँकेचे कर्ज आणि व्याज फेडणार कसे, यावर उत्पादक चिंतेत आहेत. यावर्षी माल विकल्या न गेल्यास पुढील वर्षी नवीन कुलर तयार करण्याची हिंमत कुणीही करणार नाही. कोरोनाने लग्नाचा सिझन वाया गेला तर उन्हाळाही व्यवसायाविना जात आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्ष हा व्यवसाय उठणार नाही. उत्पादकांकडे कच्च्या माल मोठ्या प्रमाणात पडून आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर फिनिश माल बनविणे परवडणार नाही. तसेच जानेवारीपासून मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत विकलेल्या मालाची उधारी वसूल होण्याची सध्यातरी गॅरंटी नाही. लॉकडाऊननंतर कारखाने सुरू झाल्यानंतरही मालवाहतूक होणार नाही. कच्चा माल कसा आणणार, हासुद्धा प्रश्न आहे. नागपूर रेड झोनमध्ये असल्याने नव्याने कुलर निर्मिती सुरू करणे शक्य नसल्याचे खेर यांनी स्पष्ट केले.आर्थिक दिलासा देण्यासाठी असोसिएशनने १० दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई-मेल पाठविले असून त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे फॉरवर्ड केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. शासनाने मदत करावी, अशी असोसिएशनची मागणी आहे.नागपुरी कुलरला भारतात मागणीविदर्भ कुलर उत्पादक असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश अवचट म्हणाले, कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला असून दोन वर्ष स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. या व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो हात बेकार झाले आहेत. लॉकडाऊन हटल्यानंतरही शेवटचा सिझन मिळेल, पण रेड झोनमुळे आम्ही निर्मितीचा आग्रह धरू शकत नाही. नागपूरच्या गर्मीत कुलर विक्री व्हावी, असे आमचे मत आहे. इंडस्ट्रीमध्ये कुलर तयार आहेत, विक्रीची परवानगी मिळावी. तसे झाल्यास बँकांचे व्याज थोडेफार कमी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या व्यवसायाची जाण आहे. त्यामुळे त्यांनी या व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतरच आर्थिक संकट दूर होणार आहे. कर्मचाºयांना मार्चचे पगार दिले आहेत. पण उत्पादकच आर्थिक संकटात असल्याने एप्रिलचे पगार कसे देणार, हा प्रश्न आहे. शासनाकडून या व्यवसायाला आर्थिक मदतीची गरज असल्याचे अवचट यांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय