जिल्ह्यात २,८१८ वर शाळा असून, येथे जवळपास ४,५०० वर स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. हा आहार शिजविण्यासाठी या स्वयंपाकी व मदतनीसांना शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करार पद्धतीने कामावर ठेवण्यात येते. त्यानुसार त्यांना १५०० च्यावर मानधनही देण्यात येते. यासाठी दर महिन्याला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जवळपास ६२ लाखावरचा निधी या स्वयंपाकी व मदतनीसांच्या वेतनासाठी लागतो. नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यापासून त्यांचे वेतनच झालेले नाही. शासनाकडून त्यांच्या वेतनासाठी निधीच उपलब्ध झालेला नाही. जि.प.च्या शालेय पोषण आहार विभागाकडून या स्वयंपाकी व मदतनीसाच्या वेतनासाठी शासनाकडे एक कोटीवरील निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सूत्राच्या माहितीनुसार अद्यापपर्यंत शासनाकडून हा निधी उपलब्ध झालेला नसल्याची माहिती आहे.
स्वयंपाकी, मदतनीसांना दोन महिन्यापासून वेतनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST