विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध दोष सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:40 IST2017-07-21T02:40:50+5:302017-07-21T02:40:50+5:30

बहुचर्चित युग चांडक अपहरण व हत्याकांड प्रकरणात गुरुवारी बाल न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एन. बेदरकर यांच्या

The conviction against the widowed child is proved | विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध दोष सिद्ध

विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध दोष सिद्ध

युग चांडक अपहरण-खून खटला : आज सुनावणार पुढची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण व हत्याकांड प्रकरणात गुरुवारी बाल न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एन. बेदरकर यांच्या न्यायालयाने विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध दोष सिद्ध झाल्याचे जाहीर केले. शुक्रवारी पुढील कारवाई सुनावली जाणार आहे.
या विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ (अपहरण), ३६४-ए (खंडणीसाठी अपहरण) आणि १२०-ब (कट रचणे), असे तीन आरोप सिद्ध झाले आहेत.
बाल न्याय कायद्यात शिक्षेचे प्रावधान नाही. हा विधिसंघर्षग्रस्त बालक घटनेच्या वेळी १७ वर्षांचा होता. आता तो २० वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पुढची कारवाई काय सुनावली जाते.

कायद्यात शिक्षेची
तरतूद नाही
बाल न्याय कायदा (सुधारित) २०१५ मध्ये विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी शिक्षेची तरतूद नाही. मात्र याच कायद्याच्या कलम १८(जी) मध्ये विधिसंघर्षग्रस्त बालकाला स्पेशल रिमांड होममध्ये जास्तीत जास्त तीन वर्षेपर्यंत ठेवण्याची तरतूद आहे. या काळात अशा बालकांना शिक्षण देणे, त्याचे समुपदेशन करणे, त्याच्या वर्तणुकीत बदल घडवणाऱ्या उपचार पद्धतीचा अवलंब करणे आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या त्याचे मनोबल वाढविणे, अशा चार बाबींचा समावेश आहे. नवी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर बाल न्याय कायद्यात ही सुधारणा करण्यात आलेली आहे.

Web Title: The conviction against the widowed child is proved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.