शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वादग्रस्त फेक ट्वीटचा शोध लागला, मुख्यमंत्री शिंदे-बोम्मई यांच्यात चर्चा 

By यदू जोशी | Updated: December 19, 2022 07:19 IST

सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलाविले असले तरी त्याने काही फरक पडणार नाही, असे ट्वीटमध्ये म्हटले होते.

यदु जोशीनागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आपल्या नावे ट्वीट करणाऱ्या व्यक्तीचा शोध लागलेला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी शिंदे यांना यावेळी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना मुख्यमंत्री आपल्या गटाच्या काही खासदारांशी रामगिरी या नागपुरातील शासकीय निवासस्थानी चर्चा करीत होते. त्याचवेळी बोम्मई यांचा त्यांना फोन आला. मुख्यमंत्री शिंदे आतील खोलीत गेले आणि त्यांची बोम्मई यांच्याशी सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर हल्ले झाले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील. दोन्ही राज्यांसाठी ही बाब योग्य नाही तेव्हा संयम राखणे आवश्यक आहे, अशी विनंती शिंदे यांनी बोम्मई यांना यावेळी केली आणि बोम्मई यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, असे सूत्रांनी सांगितले. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बोम्मई यांची एकत्रित बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यावेळी दोन्ही राज्यांच्या तीन-तीन मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले होते. आपणाकडून तीन मंत्र्यांची नावे लवकर निश्चित करा, आम्ही ती निश्चित करीत आहोत, असे बोम्मई यांनी शिंदे यांना सांगितल्याची माहिती आहे. बोम्मई यांनी सीमा प्रश्न पेटलेला असताना एक  ट्वीट केले होते, ते वादग्रस्त ठरले. सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलाविले असले तरी त्याने काही फरक पडणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. 

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असलेल्या सीमा भागाबाबतही त्यांनी वादग्रस्त ट्वीट केले होते. शहा यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत बोम्मई यांनी ते ट्वीट आपले नव्हते, फेक अकाउंटवरून कोणीतरी केले होते, अशी सारवासारव केली होती.   

कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून बेळगाव या कर्नाटकच्या उपराजधानीत सुरू होत आहे. सीमा प्रश्नाचे बेळगाव शहर हे केंद्रबिंदू राहिलेले आहे. या परिस्थितीत सीमा भागात शांतता राहावी, हेही बोम्मई यांनी शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे महत्त्वाचे कारण मानले जाते. 

फेक अकाउंट ऑपरेट करणारा ‘तो’ कोण? फेक अकाउंटवरून ते ट्वीट कोणी केले होते याचा शोध आम्ही घेतला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी शिंदे यांना रविवारी मोबाइलवरून चर्चा करताना दिली, तसेच फेक अकाउंट ऑपरेट करणारा एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याने मुद्दाम बदनामीच्या हेतूने तसे केले, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक