शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील वादग्रस्त नियुक्त्या! न्यायालयाने व्यवस्थापकीय संचालकांना समन्स बजावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:52 IST

हायकोर्टाचा आदेश : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात अवैध नियुक्त्या ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय वादग्रस्त प्राणिसंग्रहालयातील नियुक्त्यांच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी कडक भूमिका घेऊन महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना समन्स बजावला. व्यवस्थापकीय संचालकांनी वादग्रस्त नियुक्त्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शुक्रवारी (दि. १७) न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, गरज निर्माण झाल्यास संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले जातील, असेही स्पष्ट केले.

यासंदर्भात भारतीय जनता कामगार महासंघाचे सचिव सुनील गौतम यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयामध्ये अभिजित पशीने ( विधि व लेखा व्यवस्थापक), अर्जुन त्यागी (प्रकल्प व्यवस्थापक), दीपक सावंत (जनरल क्युरेटर), अमित झुरमुरे (अकाउंट असिस्टंट) व अभिजित सोनोने (स्टोअरकिपर) यांची अवैधपणे नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रतीक शर्मा यांनी बाजू मांडली. 

कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीचाही आरोपयाचिकेत कर्मचाऱ्यांच्य पिळवणुकीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांचा पीएफ कपात केला जात नव्हता. त्याची चौकशी सुरू झाल्यानंतर जून-२०१९ पासून पीएफ कपात सुरू करण्यात आली. मात्र, ईएसआयसी सुविधा, मस्टर कार्ड, नियमित काम, गणवेश, ओळखपत्र, महागाई भत्ता व दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वेतन देण्याची, कामाचा कालावधी आठ तास ठेवण्याची आणि सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याची मागणी अद्याप पूर्ण करण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालयHigh Courtउच्च न्यायालय