कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढला लाँग मार्च
By मंगेश व्यवहारे | Published: November 21, 2023 02:03 PM2023-11-21T14:03:49+5:302023-11-21T14:13:39+5:30
दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान लाँग मार्च
नागपूर : आरोग्य सेवेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्याभरापासून काम बंद आंदोलन करून संप पुकारला आहे.
मंगळवारी या कर्मचाऱ्यांनी दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान लाँग मार्च काढला. संघटनेचे मुख्य समन्वयक पवन वासनिक यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये ३०० ते ४०० कर्मचारी सहभागी झाले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानात २० वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायम करा, त्यांना सन्मानजनक किमान वेतन द्या, यासह अन्य मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहे.
दररोज या कर्मचाऱ्यांकडून छोट्या मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिवाळी अधिवेशन तोंडावर असताना हजारोंच्या संख्येने हे कर्मचारी आरोग्य सेवेचे काम बंद करून रस्त्यावर उतरल्याने आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.