शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नागपूरमधील कामगार रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:48 IST

तीन महिन्यांपासून वेतन नाही : १०० कर्मचारी संपावर, रुग्णसेवेवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रुग्णालयात जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवेचा संपूर्ण डोलारा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. हे कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत असतानाही, त्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सरकारचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. परिणामी, रुग्णालयातील रुग्णसेवा काही प्रमाणात प्रभावित झाली आहे. 

विमा कामगार रुग्णालयावर जवळपास ३ लाख ६३ हजार विमा कामगार आणि त्यांचे ११ लाख ३३ हजार ७७५ कुटुंबीय अशा मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी आहे. या वैद्यकीय सेवेसाठी कामगारांच्या वेतनातून दरवर्षी कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे पगार होतात. मात्र, सोयीसुविधा केवळ नावापुरत्याच असल्याचे चित्र आहे. मागील हिवाळी अधिवेशनात आमदार मोहन मते यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे कामगार रुग्णालयातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. परंतु, त्यानंतरही रुग्णालयातील सोयी-सुविधांमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. त्यातच 'महाराणा एजन्सी सिक्युरिटी अॅण्ड लेबर सप्लायर्स'कडून कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तोकडे आहे. त्यातही अनेकांना फेब्रुवारी महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. परंतु, त्यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे पाहून अखेर त्यांनी संप पुकारला. 

कामगार मंत्र्यांना भेटणारकर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांना दिले आहे. मंगळवारी कामगार मंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. जोपर्यंत वेतनाची समस्या सुटत नाही आणि त्यांच्या इतर मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला.

क्लरिकल वगळता सर्व विभाग प्रभावितमिळालेल्या माहितीनुसार, विमा रुग्णालयातील विविध विभागांमध्ये या एजन्सीचे जवळपास १०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी क्लरिकल विभाग वगळता टेक्निशियन विभाग, पॅथॉलॉजी विभाग, फार्मसिस्ट, नर्सेस आणि स्वच्छता कर्मचारी हे सर्वजण संपावर गेले आहेत. यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला असून, रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरStrikeसंप