अनुबंधित शिक्षकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:53+5:302021-02-05T04:42:53+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र कुही : नागपूर जिल्ह्यातील काही अनुबंधित शिक्षकांना अद्यापही नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. यासंदर्भात ...

अनुबंधित शिक्षकांना
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र
कुही : नागपूर जिल्ह्यातील काही अनुबंधित शिक्षकांना अद्यापही नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजानंद कावळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवित लक्ष वेधले आहे.
नागपूर जिल्हा परिषदअंतर्गत अधिसंख्य पदांवरील कार्यरत अनुबंधित शिक्षकांची सेवा १७ ते २० वर्षे पूर्ण होऊन सुद्धा नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. शासन निर्णयानुसार कंत्राटी शिक्षण सेवकांना तीन वर्षांच्या सेवेनंतर शासन सेवेत नियमित करून वेतनश्रेणी लागू करावी, असे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी का लागू केली नाही, असा सवाल कावळे यांनी केला आहे. २००१ पासून कार्यरत सर्व अधिसंख्य पदांवरील अनुबंधित शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी टिकाराम घोडपागे, राजू इंजेवार, विजया बारापात्रे, कांचन सीरपूरकर, सीमा नंदनवार, सुभाष सदावर्ती, संगीता बावने यांनीही केली आहे.