शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत संततधार : २४ तासात ५२.१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 22:18 IST

शुक्रवारी नागपुरात दिवसभर पावसाची हजेरी दिसून आली. कमीअधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम होता. २४ तासात शहरात ५२.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्दे‘पेंच’ ओव्हरफ्लो, १६ दरवाजे उघडले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शुक्रवारी नागपुरात दिवसभर पावसाची हजेरी दिसून आली. कमीअधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम होता. २४ तासात शहरात ५२.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातदेखील दमदार पाऊस झाला. चौराई धरणाचे ९ गेट उघडल्यामुळे तोतलाडोह धरणाचे पूर्ण १४ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे आता पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ गेट उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस आला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात १२.९ मिमी पावसाची नोंद झाली तर त्यानंतर १२ तासात ३९.२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. पुढील ४८ तासात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.पेंच ओव्हरफ्लो,१६ गेट उघडलेपारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ गेट उघडण्यात आले. पूर्ण गेट उघडण्यापूर्वी नदीशेजारील गावांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ४ गेट खुले होते .दुपारी २ वाजता पूर्ण १६ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पूर्ण गेट २ मीटरने उघडण्यात आले. सायंकाळी ६.१५ वाजता ८ दरवाजे २ मीटरने तर इतर ८ दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. एकूण ३४४८.१६ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. यासोबतच पेंचचा डावा व उजवा कालवा उघडण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही पेंच धरण बघायला येऊ नये तसेच नदीशेजारील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता प्रणय नागदेवे यांनी केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर