‘मास्टर आॅफ लेबर स्टडीज’ची प्रवेशप्रक्रिया सुरू
By Admin | Updated: June 26, 2015 02:44 IST2015-06-26T02:44:12+5:302015-06-26T02:44:12+5:30
वाढत्या औद्योगिकीकरणासोबतच कामगारांशी संबंधित मुद्यांवर अभ्यासदेखील वाढीस लागला आहे.

‘मास्टर आॅफ लेबर स्टडीज’ची प्रवेशप्रक्रिया सुरू
नागपूर : वाढत्या औद्योगिकीकरणासोबतच कामगारांशी संबंधित मुद्यांवर अभ्यासदेखील वाढीस लागला आहे. कामगारांशी संबंधित मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, कामगार कल्याण हे विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ‘मास्टर आॅफ लेबर स्टडीज’अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या कामगार विभागांतर्गत येणाऱ्या कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेद्वारा संचालित प्रादेशिक कामगार संस्थेतर्फे हा अभ्यासक्रम घेण्यात येतो.
या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाकरिता १९ जुलै २०१५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात एकूण ४० जागा असून, मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ५० टक्के जागा राखीव आहेत. या अभ्यासक्रमात मनुष्यबळ व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, कामगार कल्याण, कामगार कायदे या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. अभ्यासक्रमात ५० टक्के ‘फिल्ड वर्क’ आहे. या अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा घेण्यात येणार आहे. यात लेखी परीक्षा, गटचर्चा, मुलाखत हे टप्पे आहेत. आयटी पार्कजवळील प्रादेशिक कामगार संस्था, गायत्रीनगर येथे प्रवेशअर्ज उपलब्ध आहेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १९ जुलै आहे.(प्रतिनिधी)