लाखोची सामुग्री कवडीमोल भावात विकणार
By Admin | Updated: May 24, 2015 03:00 IST2015-05-24T03:00:41+5:302015-05-24T03:00:41+5:30
महापालिका कार्यालयातील संगणक ,स्कॅनर, प्रिंन्टर, टोनर यात किरकोळ बिघाड झाला की, ही सामुग्री भंगारात टाकली जाते.

लाखोची सामुग्री कवडीमोल भावात विकणार
नागपूर : महापालिका कार्यालयातील संगणक ,स्कॅनर, प्रिंन्टर, टोनर यात किरकोळ बिघाड झाला की, ही सामुग्री भंगारात टाकली जाते. लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली सामुग्री कवडीमोल भावात विकण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाने ही सामुग्री ई-कचऱ्यात दर्शवून ती ९४ हजारात विकणार आहे. २६ मे रोजी होणाऱ्या मनपाच्या आमसभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
संगणक डिस्क वगळता इतर नादुरुस्त साहित्य ई-कचऱ्याच्या श्रेणीत टाकरण्यात आले आहे. ई-कचरा विल्हेवाट समितीच्या बैठकीत सरकारी मूल्यांककाची नियुक्ती करून या कचऱ्याचे मूल्यांकन करण्यात आले. विशेष म्हणजे ई-कचऱ्याची उपयुक्तता व तांत्रिक माहिती असलेल्यांना या समितीत स्थान देण्यात आलेले नाही. या विषयाचे ज्ञान असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॅनर व टोनरचा पुन्हा वापर करता येतो. बाजारातही या सामुग्रीला चांगली किंमतही मिळते. परंतु ही सामुग्री कचऱ्याच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे. त्यामुळे ती कवडीमोल भावाने विकली जात आहे.
ई-कचरा समितीचे अध्यक्ष उपायुक्त (१) आहे. परंतु त्यांना चुकीची माहिती देऊन नादुरुस्त सामुग्रीची किंमत लावण्यात आली आहे. नॅशनल इन्फार्मेटीक्स सेंटर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-कचऱ्याचे मूल्यांकन करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु प्रतिसाद न मिळाल्याचे कारण देत सरकारी मूल्यांककाची नियुक्ती करण्यात आली. जाहीर लिलाव करून ही सामुग्री विक ण्याचा विचार आहे. परंतु याची किंमतच कमी दर्शविल्याने यात मनपाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)