राजगोपाल देवरांना अवमानना नोटीस
By Admin | Updated: April 21, 2017 03:06 IST2017-04-21T03:06:42+5:302017-04-21T03:06:42+5:30
मध्य भारतातील गरजू रुग्णांचा आधार असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओएसडीपदी पात्र सेवाज्येष्ठ प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे

राजगोपाल देवरांना अवमानना नोटीस
नागपूर : मध्य भारतातील गरजू रुग्णांचा आधार असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओएसडीपदी पात्र सेवाज्येष्ठ प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांना अवमानना नोटीस बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी २७ एप्रिल रोजी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेत.
गेल्या १६ मार्च रोजी न्यायालयाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओएसडीपदी पात्र सेवाज्येष्ठ प्राध्यापकाची नियुक्ती करण्याचा आदेश दिला होता. परंतु, या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. सध्या डॉ. मुकुंद देशपांडे हे प्रभारी ओएसडी म्हणून कार्य करीत असून ते कॉर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख होते. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासाविषयी न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. याप्रकरणात अॅड. अनुप गिल्डा न्यायालय मित्र आहेत.(प्रतिनिधी)