शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ५० वस्त्यांत होतोय दूषित पाणीपुरवठा ४ लाख नागरिकांना आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:59 IST

Nagpur : महापौरांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित; सात दिवसांत समस्या सोडविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नऊ झोनमधील सुमारे ५० वस्त्यांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे जवळपास ४ लाख नागरिकांना आजारांचा धोका निर्माण झालेला आहे. हा गंभीर प्रकार असल्याने महापौर नीता ठाकरे यांनी याची दखल घेत सात दिवसांत ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

स्थायी समिती सभागृहात बुधवारी आयोजित जलप्रदाय विभागाच्या आढावा बैठकीत महापौरांनी महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटरच्या (ओसीडब्ल्यू) कामाचा आढावा घेतला. दूषित पाण्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे निदर्शनास आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, काही भागांत पाणी बिलांमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याच्या तक्रारींची दुरुस्ती करा, तसेच पाइपलाइनसाठी करण्यात आलेल्या खोदकामाची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश महापौरांनी दिले. बैठकीस सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायकर आदी उपस्थित होते.

कोणत्या भागात आहेत समस्या...

  • लक्ष्मीनगर झोन : अजनी येथील ईस्ट समर्थ नगरमध्ये तक्रारी.
  • धरमपेठ झोन : दाभा बस्ती, पांढराबोडी, पंचशील नगर प्रभावित.
  • धंतोली : वंजारी नगर (जुना ईएसआर) व वसंत नगर
  • नेहरूनगर : नंदनवन लेआउट, कवेलू क्वॉर्टर, गुरुदेव नगर, ताजबाग सिंधी बस्ती व दरगाह परिसर.
  • गांधीबागः सिरसपेठ, गुलाब बाबा मठ, जलालपुरा, मिर्झा गली खदान, गणेशपेठ, राजाबक्षा, लोधीपुरा प्रभावित.
  • सतरंजीपुरा : इतवारी रेल्वे स्टेशन परिसर, प्रेम नगर, ठक्कर ग्राम, धीवरपुरा, गोसावी घाट, देवघरापुरा, भानखेड़ा, पीली मरबत चौक, विनोबा भावे नगर व इतर.
  • लकडगंज : गिरिजा नगर, गजानन मंदिर परिसर, भांडेवाडी झोपडपट्टी, पारडी, सुभान नगर ईएसआर क्षेत्र, रामपेठ, वैरागडे वाडी, एचबी टाउन प्रभावित.
  • आसीनगर : पवन नगर, योगी अरविंद नगर, आनंद बुद्ध विहार, हडको कॉलनी, नारा गाव, बाबादीप सिंह नगर येथे दूषित पाणी.
  • मंगळवारी : हसनूर आयटीआय, बोरगाव, मंजापूर येथील निखरे लेआउटमध्ये प्रदूषणाची नोंद.

बैठकीत दुर्गंधीयुक्त व गढूळ पाण्याच्या सतत येणाऱ्या तक्रारींवर चर्चा झाली. हनुमाननगर झोनमध्ये मात्र सध्या दूषित पाण्याची कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.

१०३ पाण्याच्या टाक्या

महानगरपालिकेच्या एकूण १०३ पाण्याच्या टाक्या आहेत, त्यात स्मार्ट सिटीच्या ४ टाक्यांचा समावेश आहे. या टाक्यांमधून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना दरमहा पाणी बिल सहज भरता यावे यासाठी जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूकडून क्यूआर कोड स्कॅन करून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन भरण्याचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Contaminated water supply in Nagpur threatens 4 lakh residents' health.

Web Summary : Nagpur faces a crisis as contaminated water affects 50 areas, risking the health of 4 lakh residents. Mayor Thackeray has ordered swift action within seven days. Complaints include inadequate pressure, billing errors, and delayed repairs. Affected zones include Laxminagar, Dharampeth, and Satranjipura. There are 103 water tanks.
टॅग्स :water pollutionजल प्रदूषणnagpurनागपूर