शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १३.५० लाख रुपये १० टक्के व्याजासह अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 20:22 IST

तक्रारकर्त्या ग्राहकाला ट्रकच्या विम्याचे १३ लाख ५० हजार रुपये १० टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीला एका प्रकरणात दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ६० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमदेखील कंपनीने द्यायची आहे.

ठळक मुद्देन्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला ट्रकच्या विम्याचे १३ लाख ५० हजार रुपये १० टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीला एका प्रकरणात दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ६० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमदेखील कंपनीने द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. १३ लाख ५० हजार रुपयावर १६ मार्च २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला ३० दिवसाचा वेळ देण्यात आला. विकास शरजमानी असे ग्राहकाचे नाव असून ते जरीपटका येथील रहिवासी आहेत.मंचमधील तक्रारीतील माहितीनुसार, शरजमानी यांनी ट्रक खरेदी करण्यासाठी सुंदरम फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्या ट्रकचा न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीकडून १३ लाख ५० हजार रुपयाचा विमा काढण्यात आला होता. विम्याचा कालावधी १९ जानेवारी २०१६ ते १८ जानेवारी २०१७ पर्यंत होता. संबंधित ट्रक १६ एप्रिल २०१६ रोजी चोरीला गेला. १८ एप्रिल २०१६ रोजी त्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीकडे विमा दावा दाखल करण्यात आला. तो दावा फेटाळण्यात आला. त्यामुळे शरजमानी यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने नोटीस बजावल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून तक्रारीतील आरोप फेटाळून लावले व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.निर्णयातील निरीक्षणउपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता ट्रकची चोरी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर करणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने विविध कारणांनी विमा दावा नाकारला. त्या निर्णयात तथ्य दिसून येत नाही. तसेच, कंपनीने सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे विविध बाबींवरून स्पष्ट होते. परिणामी, तक्रारकर्ता विम्याची रक्कम व भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे