शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

योगदा कन्स्ट्रक्शनला ग्राहक आयोगाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:01 IST

महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका वकील ग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर करून योगदा कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड असोसिएटस्, असोसिएटस्चे भागीदार सुनील जोत व जमीन मालक विवेक वैद्य या प्रतिवादींना दणका दिला.

ठळक मुद्देग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर : ५.१० लाख रुपये भरपाई दिली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका वकील ग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर करून योगदा कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड असोसिएटस्, असोसिएटस्चे भागीदार सुनील जोत व जमीन मालक विवेक वैद्य या प्रतिवादींना दणका दिला.येत्या सहा महिन्यांमध्ये रखडलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे, ग्राहकाला सदनिकेचा ताबा देण्यात यावा व सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून देण्यात यावे असे आदेश प्रतिवादींना देण्यात आले आहेत. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५ लाख व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. विक्रीपत्र नोंदवण्याच्या वेळी सदनिकेची उर्वरित रक्कम प्रतिवादींना अदा करण्यात यावी असे ग्राहकाला सांगण्यात आले आहे. खंडपीठाचे पीठासीन सदस्य बी. ए. शेख व सदस्य जयश्री येंगल यांनी हा निर्णय दिला.मनोज साबळे असे ग्राहकाचे नाव आहे. तक्रारीतील माहितीनुसार, साबळे यांनी प्रतिवादींच्या हितेश्री कृष्णा मंगल आर्केड या बहुमजली इमारतीमधील एक सदनिका ५२ लाख रुपयांत खरेदी करण्याचा करार केला आहे. करारानुसार, साबळे यांनी प्रतिवादींना आतापर्यंत २६ लाख रुपये दिले आहेत. परंतु, प्रतिवादींमधील वादामुळे इमारतीचे तिसऱ्या माळ्यानंतरचे बांधकाम रखडले असल्याने साबळे यांनी पुढील रक्कम थांबवून ठेवली. तसेच, ११ जानेवारी २०१६ रोजी प्रतिवादींना कायदेशीर नोटीस बजावून इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली. त्याचा काहीच फायदा झाला नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १७ अंतर्गत तक्रार आयोगात तक्रार दाखल केली होती.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर