शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

वात्सल्य रियालिटीजला ग्राहक आयोगाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 21:40 IST

Consumer Commission शहरातील वात्सल्य रियालिटीज फर्म व फर्मचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल गाडगे यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये जोरदार चपराक बसली.

ठळक मुद्देग्राहकाचे ११.५८ लाख रुपये १४ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : शहरातील वात्सल्य रियालिटीज फर्म व फर्मचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल गाडगे यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने त्यांना तक्रारकर्त्या ग्राहकाचे ११ लाख ५८ हजार ७५८ रुपये १४ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश दिला. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही वात्सल्य रियालिटीज व गाडगे यांनी द्यायची आहे.

सीआरएम रेड्डी असे ग्राहकाचे नाव असून ते चंदननगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर आयाेगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी निर्णय दिला. संबंधित रकमेवर १९ सप्टेंबर २०१९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. तसेच, वात्सल्य रियालिटीज व गाडगे यांना या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, रेड्डी यांनी वात्सल्य रियालिटीजच्या मौजा वाठोडा येथील ‘वात्‍सल्‍य गोल्‍ड’ योजनेतील दोन भूखंड खरेदी करण्यासाठी ९ मे २०१५ रोजी करार केला. त्यानंतर वात्सल्य रियालिटीजला एकूण ११ लाख ५८ हजार ७५८ रुपये अदा केले. दरम्यान, रेड्डी यांनी भूखंडांचे विक्रीपत्र करून मागितले असता, वात्सल्य रियालिटीजने त्याकडे लक्ष दिले नाही. ले-आऊट विकासाकरिताही काहीच कृती केली नाही. त्‍यामुळे रेड्डी यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. त्यात आयोगाने वात्सल्य रियालिटीजला नोटीस जारी केली. नोटीस तामील होऊनही ते आयोगासमक्ष हजर झाले नाही. परिणामी, आयोगाने तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही केली व रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून सदर निर्णय दिला.

अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब

वात्सल्य रियालिटीज व प्रफुल्ल गाडगे यांनी भूखंड विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्वीकारूनही तक्रारकर्त्‍याला विक्रीपत्र करून दिले नाही. ही त्रुटीपूर्ण सेवा आहे. तसेच, अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी सदर कृती आहे असे मत आयोगाने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :consumerग्राहक