बांधकाम कामगारांनी केली मंदिरात चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:31+5:302021-09-14T04:12:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : चाेरट्याने कवडस (ता. हिंगणा) येथील दुर्गा मंदिरातील दानपेटी फाेडून त्यातील २० हजार रुपये चाेरून ...

Construction workers looted the temple | बांधकाम कामगारांनी केली मंदिरात चाेरी

बांधकाम कामगारांनी केली मंदिरात चाेरी

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : चाेरट्याने कवडस (ता. हिंगणा) येथील दुर्गा मंदिरातील दानपेटी फाेडून त्यातील २० हजार रुपये चाेरून नेले. यात पाेलिसांनी एका चाेरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून ५,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना साेमवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली. अटकेतील आराेपी हा बांधकाम कामगार असल्याची माहिती ठाणेदार बलराम परदेशी यांनी दिली.

राजकुमार जयराम वाघाडे (१९, रा. कडीकसा, ता. देवरी, जिल्हा गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कवडस येथील दुर्गा मंदिरापासून काही अंतरावर राेड असून, त्या राेडच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या मंदिरात चाेरी झाल्याचे व दानपेटीतील २० हजार रुपये चाेरून नेल्याचा प्रकार साेमवारी सकाळी उघडकीस आला. हिंगणा पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली व गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली.

संशयाच्या बळावर पाेलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचा साथीदार पळून गेल्याचे पाेलिसांना सांगितले. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्याकडून ५,२६० रुपये जप्त केले. त्या दाेघांनी रविवारी (दि. १२) मध्यरात्री मंदिराच्या दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला व दानपेटीतील रक्कम लंपास केली, असेही त्याने सांगितले. त्याच्या साथीदारास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार बलराम परदेशी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Construction workers looted the temple